Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

राहुरी पोलिसांचा टवाळखोर आणि प्रेमी युगलांनी घेतला धसका

देवळाली प्रवरा ः अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी गुरूवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी देवळाली प्रवरा शहरा

रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा
पदोन्नती आरक्षण रद्दच्या त्या आदेशाला खंडपीठात आव्हान ; पारनेरच्या आंबेडकरांची जनहित याचिका
राज्यस्तरीय किक बॉक्सिंगमध्ये जामखेडला 6 सुवर्णपदके

देवळाली प्रवरा ः अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी गुरूवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी देवळाली प्रवरा शहरातून धिंड काढली होती. देवळाली प्रवरा बाजारतळ, संपूर्ण शहरातून व महाविद्यालय व विद्यालय परिसरात अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील 5 आरोपींना पायी फिरवल्याने गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच धाक बसला आहे. त्याच बरोबर टवाळखोर व प्रेमी युगलांनी धसका घेतला आहे.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या 16 पैकी 10 अल्पवयीन पीडित मुलींचा शोध घेऊन आरोपींना गजाआड करून अल्पवयीन मुलीस पळविण्यास मदत करणार्‍या मिञ व नातेवाईकांवर गुन्हे दाखल करुन तपासकामी ताब्यात घेतले आहे. गुरूवारी सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पोलीस पथकाने अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणातील 5 आरोपीमधील सिताराम बाळासाहेब गायकवाड, आजय बाळू शिरोळे, परसराम केशव निकम, सुनिल सुर्यवंशी, आकाश सुनिल पवार यांना देवळाली प्रवरा शहरातून धिंड काढली. महाविद्यालय व शाळा परिसरात फिरवले आहे. आरोपींना पायी फिरवत नेल्याने शाळा व महाविद्यालय परिसरात फिरणार्‍या टवाळखोर व प्रेमी युगलांवर चांगलाच वचक बसला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक विष्णू आहेर, सहायक पोलिस उपनिरीक्षक फुलारी, हनुमंत आव्हाड, विकास साळवे, जानकीराम खेमनर, अमित राठोड, सम्राट गायकवाड, लिपणे आदिंसह होमगार्ड जवान उपस्थित होते.

COMMENTS