Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धावपळीच्या युगामध्ये मैदानी खेळ महत्त्वाचे ः सुधाकर वक्ते

कोपरगाव शहर ः आजच्या या धावपळीच्या युगात वैयक्तिक जबाबदार्‍या व मोबाईलचा अती वापर यामुळे तरुणाईला व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही, अशातच मै

बाबासाहेब दहे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
शिक्षक व शिक्षकेतरांचे पगार दिवाळीपूर्वी होणार
Ahmednagar : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवा… बैलांसह शेतकरी उतरले रस्त्यावर I LOK News 24

कोपरगाव शहर ः आजच्या या धावपळीच्या युगात वैयक्तिक जबाबदार्‍या व मोबाईलचा अती वापर यामुळे तरुणाईला व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही, अशातच मैदानी खेळातुन होणार्‍या कसरतीमुळे व्यायामाची गरज भरून निघतेच तसेच मानसिक स्वास्थ देखील आबादीत राहते. सांघिक खेळामुळे संघटनात्मक कौशल्याचा देखील विकास होतो.अशा प्रकारच्या खेळामुळे तरूणाई एकत्र येत असून खेळ भावना वाढीस लागते असे प्रतिपादन शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भजपा युवा मोर्चा कोपरगाव तालुका अध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी व्यक्त करत सर्वांनी मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे श्रीमंत मारूती मंदिर या ठिकाणी रोज संध्याकाळी हॉलीबॉल हा खेळ  खेळला जातो. या प्रसंगी वक्ते यांनी बोलताना सांगितले की, मोबाईलचा अतिवापर आणि अलीकडील काळामध्ये ग्रामीण भागांमध्ये खेळासाठी उपलब्ध असलेल्या मैदानांची संख्या कमी होत आहे किंवा मैदानाचे क्षेत्रफळ कमी होत आहे ही बाब गंभीर  आहे. सांघिक खेळाच्या माध्यमातून तरुण मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असून एकीची भावना दृढ होत जाते त्यामुळे अशा प्रकारच्या मैदानी खेळांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.या मैदानी हॉलीबॉल खेळात  संजय कारभारी गुरसळ, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड,अजय गुरसळ, शरद चव्हाण, किरण गुरसळ, शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे माजी अध्यक्ष विशाल गुरसळ, संदीप राऊत, संदीप वक्ते, अभिजीत गुरसळ, सौरव पवार, सौरव गुरसळ, ऋषी गुरसळ, अक्षय गुरसळ, विकी जगताप, अथर्व गिरमे, सागर गुरसळ, अक्षय चव्हाण, बंटी मेहेत्रे, कैलास जोर्वे, बलविर गरूड, पप्पु वक्ते, यश चव्हाण, लाला गांगुर्डे, ऋषिकेश मेहेत्रे आदींनी भाग घेतला आहे.

COMMENTS