मुंबई ः धारावीमध्ये एका मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे शनिवारी या भागात मोठा तणाव बघायला मिळाला. शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी संतप्त जमाव
मुंबई ः धारावीमध्ये एका मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे शनिवारी या भागात मोठा तणाव बघायला मिळाला. शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी संतप्त जमावाने मुंबई महापालिकेच्या गाडीवर दगडफेक केली असून, रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. यामुळे खबरदारी म्हणून येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पाडापाडीच्या कारवाईला आठवड्याभराची स्थगिती देण्यात आली आहे.
धारावी परिसरात सुभानिया नामक एक मशीद आहे. या मशिदीचाी काही भाग अवैध असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. हा अवैध भाग पाडण्यासाठी मुंबई महापालिकेचे काही कर्मचारी शनिवारी तिथे गेले होते. त्यांनी मशिदीचा अवैध भाग पाडला. यामुळे येथे मोठा तणाव निर्माण झाला. महापालिकेच्या या कारवाईविरोधात स्थानिक नागरीक रस्त्यावर उतरले. त्यांनी या कारवाईला विरोध दर्शवला. यावेळी त्यांची अधिकार्यांशी बाचाबाची झाली. अखेर संतप्त जमावाने दगडफेक करत बीएमसीच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. धारावी येथील 90 फुटी रोडवर सुभानिया मशीद आहे. ती 25 वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती पाडू नये अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. पण त्यानंतरही मुंबई महापालिकेने पाडापाडीची कारवाई केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.या घटनेची खबर मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ पाऊले उचलली. स्थानिकांना समजावून सांगत वाहतूक सुरुळीत करण्याची विनंती केली. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दगडफेक न करण्याचेही आवाहन केले. त्यानंतर आंदोलकांनी रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी खुला केला. पण मशीद परिसरात तणाव अद्याप कायम आहे. पोलिस स्थानिकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. धारावीतील परिस्थिती बघता मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त धारावीत दाखल झाले आहेत. आयुक्तांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तसेच खासदार वर्षा गायकवाड देखील दाखल झाल्या आहेत. मशिदीचे ट्रस्टी आणि खासदार वर्षा गायकवाड यांची पोलिसांसोबत बैठक झाली आहे. पोलिस अधिकार्यांशी बोलत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बांधकाम पाडण्यासाठी सहा दिवसांची स्थगिती – धारावी कार्यक्षेत्र असलेल्या तथा उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गायकवाड यांनी ठिय्या मांडत नागरिकांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच मशिदीच्या पाडकामाला देखील स्थगिती देण्यात आली आहे. सहा दिवसांसाठी या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.
COMMENTS