Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

मुंबई ः राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक होत असल्याचा दावा महायुती सरकारकडून करण्यात येत असला तरी, महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात य

मुंबईमध्ये फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या
साहेब चषक संभाजीनगरच्या यंग बॉईजने पटकावला
माहित आहे काय ? अभिनेत्री मौनी रॉय कोणाबरोबर विवाह बंधनात अडकणार

मुंबई ः राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक होत असल्याचा दावा महायुती सरकारकडून करण्यात येत असला तरी, महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात येत असल्याची विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतांना महाराष्ट्रातील तब्बल 18 हजार कोटींचा सोलार प्रकल्प गुजरातला पळवल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ट्विट करून वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
यावेळी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात हिंदू-मुस्लिम, जीभ कापा-जीभेला चटके द्या, पक्ष फोडा-आमदार पळवा, असे सतत निरर्थक उद्योग करणार्‍या सरकारमुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योग राज्यातून पलायन करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर्सचा 1 लाख 54 हजार हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रात सर्वप्रथम रण पेटले होते. त्यानंतरही काही प्रकल्प गुजरातला गेले. या मुद्यावरून महाविकास आघाडीने महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप केला आहे. वडेट्टीवार गुरुवारी एका ट्विटमध्ये म्हणाले, महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे! महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत, विजय वडेट्टीवार म्हणाले.

COMMENTS