Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे 14.52 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

कोपरगाव तालुका ः कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांचे खडीकरन, डांबरीकरण व अंडर ग्राउंड ड्रेनेजचे 14.52 कोटी रुपये कामांचे भूमिपू

अखेर कचरा डेपोचे कुलूप पालिकेनेच तोडले
मोबाईलच्या विळख्यातून मुलांची सुटका गरजेची ः स्नेहलता कोल्हे
तीन कोटींच्या विम्याची हाव, महिलेने पतीला कारमध्ये जिवंत जाळलं! पहा सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24

कोपरगाव तालुका ः कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांचे खडीकरन, डांबरीकरण व अंडर ग्राउंड ड्रेनेजचे 14.52 कोटी रुपये कामांचे भूमिपूजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे, प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत व्हा.चेअरमन केशवराव भवर यांनी केले.
यावेळी प्रास्ताविक करताना विवेक कोल्हे यांनी कोपरगाव औद्योगिक वसाहत ही सुरवातीला जबाबदारी स्वीकारली तेव्हा उत्पनाच्या तुलनेत खर्च अधिक असा ताळेबंद होता.नंतर आवश्यक त्या पद्धतीने पावले उचलून स्व.शंकरराव कोल्हे साहेबांनी घालून दिलेला संस्था हिताच्या विचाराने घडी बसवली.आपल्याकडे सर्व प्रकारची समृद्धता आहे मात्र पाण्याचे नियोजन आणि तूट असल्याने व्यवसाय अवघड होत चालले आहे.तसेच युवकांना आज रोजगार हा सर्वात मोठा प्रश्‍न समोर उभा आहे.अनेकांना शिक्षण असून नोकरी उपलब्ध होत नाही त्यामुळे विवंचना आहे.यासाठी मोठे काम उभे करावे लागणार आहे.  बिपीनदादा कोल्हे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत जागतिक पातळीवर विविध प्रदेश हे कसे अग्रस्थानी आले हे सांगितले. काका कोयटे यांनी विवेक कोल्हे यांच्यात माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे व्हिजन दिसते.त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे औद्योगिक वसाहत प्रगती पथावर नेली आहे. मला पारखण्याचे काम स्व.शंकरराव कोल्हे यांनी केले होते व आपल्या आत्मचरित्रात देखील त्यांनी माझा उल्लेख तालुक्याचे नाव मोठे करणारांच्या यादीत असेल असा केला होता अशी आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. या वेळी मनोजशेठ अग्रवाल, रोहित वाघ, प्रशांत होन, सागर शहा,पंडित भारुड,संजय जगदाळे, पप्पूशेठ सारडा, अभिजित रहातेकर, डॉ.चंद्रशेखर आव्हाड, मुनिषशेठ ठोळे आदींसह सर्व संचालक, कारखानादार, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आभार रोहित वाघ यांनी मानले  

COMMENTS