Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरपंच पूजा सूर्यवंशी यांची ’यशदा’च्या प्रशिक्षणासाठी निवड

कर्जत : ग्रामविकास मंत्रालयाच्या महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुकच्या सरपंच पूजा

नगर अर्बन बँकेच्या कर्जखात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट
शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल l पहा LokNews24
अवैध दारूची वाहतूक करणारे जेरबंद

कर्जत : ग्रामविकास मंत्रालयाच्या महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुकच्या सरपंच पूजा प्रकाश सूर्यवंशी यांचा सहभाग निश्‍चित झाला आहे. या प्रशिक्षणाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) माध्यमातून करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील आणखी 4 महिलांचा यामध्ये समावेश आहे.
18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2024 या तीन दिवस चालणार्‍या या प्रशिक्षणात महिला सशक्तीकरणाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिला सशक्तीकरण हे उद्दिष्ट ठेऊन, राज्यस्तरीय प्रतिनिधींना ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी आवश्यक कौशल्ये आणि तांत्रिक ज्ञान प्रदान करण्याचे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे. महिलांच्या नेतृत्व विकास, सामाजिक अधिकार, आर्थिक सक्षमीकरण, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभावी सहभाग यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या प्रशिक्षणात सखोल चर्चा होईल. या उपक्रमातून सहभागी महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक जबाबदारीने आणि सक्षमपणे काम करता येणार आहे.

COMMENTS