Homeताज्या बातम्यासंपादकीय

मनोज जरांगे पाटील : इव्हेंट मॅनेजमेंट की सत्ता संघर्ष ?

उपोषणाची आंदोलने आणि धरणे आंदोलने ही 2012 पासून या देशाने अधिक पाहिली. तेव्हापासून या देशाचा एक पक्का समज झाला आहे की, अशा प्रकारची आंदोलने ही  ह

समझदार सभी जानते है….. बिसलेरी !
शाक्तपंथी छत्रपती संभाजी महाराज ! 
ब्रिटनचे माणूस केंद्रीत धोरण ! 

उपोषणाची आंदोलने आणि धरणे आंदोलने ही 2012 पासून या देशाने अधिक पाहिली. तेव्हापासून या देशाचा एक पक्का समज झाला आहे की, अशा प्रकारची आंदोलने ही  हाताळले जात असतात! असा जाहीर आरोप वारंवार केला जातो. सध्या, महाराष्ट्रात देखील गेल्या साधारण दोन वर्षांपासून सातत्याने उपोषणाचं हत्यार उपसले जात आहे. हे हत्यार मराठा आरक्षणासाठी उपसणारे मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आंदोलन करते झाले आहेत. यापूर्वी, अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि जन पाठिंबा मिळाला होता. परंतु, ही प्रसिद्धी देणारी माध्यमे ही लोकहितासाठी किंवा लोकांच्या समोर असणार्‍या प्रश्‍नांसाठी मोठ्या प्रमाणात आवाज का उठवत नाही? आरक्षणाच्या अवतीभोवती ही प्रसार माध्यमे जी गुंतूवून घेतात; या मागची ही कारणे शोधली गेली पाहिजे. खरंतर, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच हत्यार इतक्या वेळा उपसले आहे की, आता त्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात शंका उपस्थित होते की, आंदोलनासाठी लागणारा सगळा लवाजमा आणि जन पाठिंबा ते एका शब्दात, एका रात्रीत कसा मिळवतात? हा इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग आहे की चळवळीचा भाग आहे, की मराठा राजकारणाच्या हितसंबंधांचा भाग आहे? काहीही असलं तरी, कोणताही प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत आंदोलनाच्या संवैधानिक मर्यादा आहेत.

त्या मर्यादेतच ही आंदोलने व्हायला हवीत. परंतु, आंदोलने आता लोकांना वेठीस धरणारी होऊ पाहत आहेत. अशा आंदोलनाला एक प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे का? महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक सामाजिक चळवळींचा उदय झाला. सामाजिक चळवळींच्या माध्यमातून अनेक आंदोलन झाली. सामाजिक माध्यमातून झालेल्या चळवळींमध्ये मोठ्या प्रमाणात जनतळ देखील महाराष्ट्राने पाहिला. यामध्ये, समाजवादी विचारांच्या चळवळी असू द्या, डाव्या विचारांच्या चळवळी असू द्या, फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांच्या चळवळी असू द्या, की लोहियावादी चळवळी असू द्या, या सगळ्याच चळवळींना मोठ्या प्रमाणात जन पाठिंबा या राज्यात मिळालेला आहे. त्यामुळे, महाराष्ट्र हे केवळ संतांचं आणि महापुरुषांचेच राज्य नव्हे, तर इथे सातत्याने जनमानसात सामाजिक विचार रुजलेला आहे. या रुजलेल्या विचारांची मुळे इतकी खोल आहेत की, महाराष्ट्रामध्ये कोणतीही असमाजिक कृती करणं कोणत्याही सत्ताधिशांना शक्य होत नाही! सत्ता मिळवण्यासाठी किंवा मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी आपल्यासोबत जनतळ दिसावा, यामधून एक माईंड गेम साधला जातो. असा प्रयत्न जे राजकीय नेते करीत आहेत, तेच इव्हेंट मॅनेजमेंट उभे करीत आहेत.

या इव्हेंट मॅनेजमेंटचाच भाग आता आम्हाला उपोषणाच्या माध्यमातून दिसतो आहे, असं म्हणण्यावाचून आता पर्याय राहत नाही. कारण, कोणताही लोकनेता जनतेचा विचार आधी करतो आणि नंतरच तो आपल्या हक्क आणि अधिकारांचा विचार करतो. जनता ही बहुत जातीय समाजाची बनते. त्या जनतेचा विचारही प्राधान्याने व्हावा. ती जनता वेठीस धरली  धरली जाते. जेथे जनता वेठीस धरली जाते ती आंदोलने सामाजिक नसतात. सामाजिक नसलेली आंदोलने ही जनतेच्या हिताची नसतात. जनतेच्या हिताची नसूनही काही आंदोलने एक जातीय म्हणून जेव्हा उभी राहतात, तेव्हा ती इव्हेंट मॅनेजमेंटचा तरी भाग असतात किंवा सत्तेच्या संघर्षाचा तरी भाग असतात. किंबहुना, महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता राहिलेल्या मराठा समाजाचा तरी तो एक प्रयत्न असावा, यापैकी कुठलातरी एक भाग आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे की जनतेचे आंदोलन आहे, हे ठरविणे आता अवघड झाले आहे.

COMMENTS