Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेत भावांची घुसखोरी

त्या 12 भावांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव

छ संभाजीनगर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे अर्ज दाखल करून लाभ लाटण्याचा प्

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतला हुर्डा खाण्याचा आस्वाद
शहाजीराजे भोसले स्मारकाचा विकास करणार ः केंद्रीय मंत्री डॉ. कराड
‘शासकीय योजनांची जत्रा’ची प्रभावी अंमलबजावणी करावी ः विभागीय आयुक्त केंद्रेकर

छ संभाजीनगर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे अर्ज दाखल करून लाभ लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आल्यानंतर या योजनेत आता भाऊच घुसखोरी करत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या आधार क्रमांकाचा वापर करुन एका व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण ताजे असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलांचे फोटो लावून स्वत: अर्ज भरल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी प्रस्ताव पाठव्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण’ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संभाजी नागरच्या कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याची बाब महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यात 12 अर्ज असे आले होते, स्क्रुटिनीच्या वेळी ते अर्ज पुरुषांचे असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे ते रिजेक्ट करण्यात आले आहेत. यात आधार कार्ड महिलांचे आणि नाव पुरुषाचे होते, अशी माहिती महिला व बाल्य कल्याण विभागाच्या अधिकारी रेश्मा चिमंद्रे दिली. ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले असून त्यातील 90 हजार 957 मंजूर करण्यात आले आहेत, तसेच तांत्रिक कारणाने 428 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, तर 357 रद्द केले आहेत. दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या अर्जाची या विभागाच्या कर्मचार्‍यांनी 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता हा प्रकार समोर आले. तालुक्यातील 12 जणांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज अपलोड केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. आता या प्रकरणात कारवाई होणार आहे.

COMMENTS