Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 25 उमेदवार ठरले ?

पुणे ः महायुतीमध्ये जागावाटप लवकर करण्याची मागणी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडून करण्यात येत असल

 मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे 
बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल.
कोणी ही सत्तेचा तांब्रपट घेऊन आलेले नाही .

पुणे ः महायुतीमध्ये जागावाटप लवकर करण्याची मागणी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडून करण्यात येत असले तरी, महायुतीचे अजूनही जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. मात्र राष्ट्रवादी काँगे्रसकडून 25 जागांवर आपले उमेदवार फायनल केल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 25 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यात अजित पवार यांच्यासह बहुतांश विद्यमान आमदारांच्या नावांचा समावेश आहे. अजित पवार स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. राष्ट्रवादीने अद्याप या यादीची पुष्टी केली नाही, पण ही यादी फायनल असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 25 संभाव्य उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली. अजित पवार यांनी नुकतेच बारामती विधानसभा मतदारसंघ सोडण्याचे संकेत दिले होते. पण या बैठकीत बारामती येथून तेच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय पुणे हिट अँड रन प्रकरणात वादाच्या भोवर्‍यात अडकलेले आमदार सुनील टिंगरे यांच्याही नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. सुनील टिंगरे त्यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातूनच मैदानात उतरतील अशी माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी – या संभाव्या यादीनुसार बारामती-अजित पवार, येवला-छगन भुजबळ, आंबेगाव-दिलीप वळसे-पाटील, परळी-धनंजय मुंडे, कागल-हसन मुश्रीफ, दिंडोरी-नरहरी झिरवळ, रायगड-अदिती तटकरे, अहमदनगर-संग्राम जगताप, खेड-दिलीप मोहिते-पाटील, अहेरी-धर्मराव बाबा अत्राम, कळवण-नितिन पवार, इंदापूर-दत्ता भरणे, उदगीर-संजय बनसोडे, पुसद-इंद्रनील नाईक, वाई खंडाळा महाबळेश्‍वर-मकरंद आबा पाटील, पिंपरी-अण्णा बनसोडे, मावळ-सुनील शेळके, अमळनेर-अनिल पाटील, जुन्नर-अतुल बेनके, वडगाव शेरी-सुनील टिंगरे यांचा समावेश आहे.

COMMENTS