अकोले ः अगस्ती सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारच्या वतीने 94 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. अगस्तीच्या सत्ताधार्यांनी हे कर्ज अत्यंत काटकसर
अकोले ः अगस्ती सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारच्या वतीने 94 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. अगस्तीच्या सत्ताधार्यांनी हे कर्ज अत्यंत काटकसरीने, भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने व अगस्ती कारखाना कर्जमुक्तीकडे कसा जाईल या दृष्टिकोनातून वापरावे अशी अपेक्षा तालुक्यातील जनता बाळगून आहे. अगस्ती कारखान्याकडून शेतकर्यांच्या उसाच्या पेमेंटचे काही देणे बाकी आहे. त्याचप्रमाणे कामगारांची देणी व थकलेले पगार देणे बाकी आहे. अगस्तीच्या संचालक मंडळाने कामगार व शेतकर्यांची देणी द्यावीत व उरलेली मोठी रक्कम यापूर्वी घेतलेले अल्पमुदतीचे व मोठ्या व्याजदराचे कर्ज फेडण्यासाठी वापरावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केली आहे
अगस्ती सहकारी साखर कारखाना काटकसरीने चालवून तो कर्जमुक्तीकडे न्यावा यासाठी अकोल्याच्या जनतेने शेतकरी समृद्धी मंडळाला सत्ता दिली. तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये आ. डॉ. किरण लहामटे, आमदार बाळासाहेब थोरात साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वजण त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये होते. 2019 ला धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ करण्याच्या भूमिकेतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही एकास एक प्रक्रियेचा भाग बनत महाविकास आघाडी बरोबर सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. स्वाभाविकपणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी प्रणित शेतकरी समृद्धी मंडळाबरोबर सामील होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखाना सुरू राहावा ही येथील शेतकरी, कामगार व तमाम जनतेची रास्त अपेक्षा होती. उपलब्ध पर्यायांपैकी त्यावेळी कारखाना कोण चालवू शकतो ? याचा सारासार विचार करून शेतकरी समृद्धी मंडळाबरोबर राहणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उचित समजले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी, कामगार आणि श्रमिक जनतेबरोबर जैविक एकजूटता ठेवणारा पक्ष आहे. तालुक्यातील शेतकरी व कामगार यांची जी भूमिका आहे, तीच भूमिका यापूर्वी माकपची राहिली आहे. पुढेही तीच भूमिका माकपची राहील. अगस्ती चालवणारांनी अधिक सचोटीने, भ्रष्टाचार मुक्त व काटकसरीने कारभार करून कारखाना कर्जमुक्तीकडे न्यावा, मिळालेल्या कर्जाची पै ना पै अत्यंत विचारपूर्वक व काळजीने वापरावी असे आवाहन माकपचे डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, गणेश ताजणे यांनी केले आहे.
COMMENTS