Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिद्धेश काळेची थाळी फेक क्रीडा स्पर्धेसाठी निवड

अकोले ः अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेले खिरविरे येथील तसेच संगमनेर येथील एस.एम.बी.एस.टी कॉलेजचा विद्यार्थी सिद्धेश राजू काळे या

अहमदनगर महानगरपालिकेच्या मु्ख्य लेखा अधिकाऱ्यास झाला दंड
सिंचन विहिरींसाठी आणि अधिकार्‍यांवरील कारवाई विरोधात आमदार रोहित पवार यांनी दंड थोपटत दिला आंदोलनाचा इशारा
…तोपर्यंत समाजातील गुन्हेगारी कमी होणार नाही ः आ. तनपुरे

अकोले ः अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेले खिरविरे येथील तसेच संगमनेर येथील एस.एम.बी.एस.टी कॉलेजचा विद्यार्थी सिद्धेश राजू काळे याची थाळी फेक या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अहमदनगर जिल्हा थलेटिक्स असोसिएशन आयोजित, जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन 31 ऑगस्ट 2024 रोजी प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरा नगर (लोणी) ता.राहता जि.अहमदनगर येथे करण्यात आले होते. त्यामध्ये थाळी फेक या क्रीडा प्रकारात सिद्धेश राजू काळे याने घवघवीत यश संपादन करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असून त्याची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या नेत्रदीपक कामगिरीमुळे सिद्धेशला राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्याकडून संगमनेर तालुका उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.यापूर्वी देखील हात इंजुरी मध्ये असताना सिद्धेशने प्रथम क्रमांक मिळवला म्हणून जिल्हा क्रीडा कमिटीने त्याचे अभिनंदन केले आहे. याबद्दल संगमनेर एस.एम.बी.एस.टी कॉलेजचे प्राचार्य डी.डी.पाटील,उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, क्रीडा शिक्षक प्रमोद खैरे, सर्व कॉलेज स्टाप, खिरविरे ग्रामपंचायतीचे सरपंच गणपतराव डगळे,उपसरपंच सुभाषशेठ बेणके, माजी उपसरपंच रामभाऊ बेनके,काशिनाथ बेनके,काळू पुनाजी बेनके, दशरथ कुलाळ, बाळू बेनके,दिनेशशेठ शहा, त्रंबक पराड, निवृत्ती पराड यांसह सर्वोदय विदयालयाचे माजी प्राचार्य अंतुराम सावंत,लहानू पर्बत, प्राचार्य मधूकर मोखरे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदिंनी अभिनंदन केले.तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS