Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधकांकडून महाराष्ट्र अशांत करण्याचा डाव

मुख्यमंत्री शिंदे यांची विरोधकांच्या आंदोलनावर टीका

मुंबई ः विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधक दंगलीची भाषा करत होते. महाराष्ट्र अशांत करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्र

ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी नाहीच
बांगलादेशात अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी
राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार

मुंबई ः विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधक दंगलीची भाषा करत होते. महाराष्ट्र अशांत करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभेपूर्वी केला आहे. मात्र देशातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महायुती सरकार काम करत असल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. महाविकास आघाडीने आज मुंबई येथे महायुती सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे झाले आहेत. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालय देखील आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल. लाडक्या बहिणी खोडा घालणार्‍यांना जोडा मारल्याशिवाय राहणार नाहीत असेही मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहीण योजनेला विरोध करणार्‍यांच्या विरोधात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी काही लोक कोर्टात गेले आहेत. त्यांचा इतिहास बघा. कुणाचे आहेत हे लोक. मी तेव्हाही म्हणालो होतो कोर्ट आमच्या बहिणीवर अन्याय करणार नाही. बहिणींना न्याय देईल. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का? नवनीत राणांना जेलमध्ये टाकले. कंगना राणौतचे घर तोडले. किती महिलांवर अन्याय केला… महाविकास आघाडी सरकारमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नये असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

COMMENTS