Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुसडगावमध्ये राज्य राखीव पोलिस दल केंद्रासाठी  पाणीपुरवठा पाईपलाईनचे भूमिपूजन : शरद कारले

जामखेड ः कर्जत व जामखेड तालुक्यातील महिला, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आ. राम शिंदे हे सातत्याने प्रयत्न करत असताना त्यांच्या पाठ

नगर पोलिसांचा डंका…मिटके व देशमुखांना बक्षिसे
वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी ः अजित नवले
पञकार संघाच्या वतीने कोपरगाव येथे कोविड योध्दा रक्तदान शिबीर

जामखेड ः कर्जत व जामखेड तालुक्यातील महिला, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आ. राम शिंदे हे सातत्याने प्रयत्न करत असताना त्यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या कुसडगांव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या काजेवाडी ते कुसडगाव  दरम्यान पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे भुमीपुजन म्हणजे त्यांचे शासकीय कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याकडेही लक्ष असल्याचे मत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी व्यक्त केले.
माजीमंत्री व भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्यातून जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव दलाच्या 1300 अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निर्माण केलेल्या वसाहतीच्या पाणी पुरवठा योजनेचा जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले यांच्या हस्ते व पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, उद्योजक राजूशेठ देशपांडे, सरपंच पप्पू कात्रजकर, हभप पाठक महाराज व सोसायटी चेअरमन केशव कात्रजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून व प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. काजेवाडी तलावाच्या उद्भवावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी 2.23.66,850/- इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून ही योजना पुर्ण झाल्यानंतर राज्य राखीव दलाच्या 1300 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वसाहतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने सदर कर्मचार्‍यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या पाणी पुरवठा योजनेच्या भुमीपुजन कार्यक्रमासाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगावचे समादेशक दिलीप खेडेकर, विकास पाटील, पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटणे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग बुरंगे  यांच्या आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS