Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसचे दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर ?

हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई ः विधानसभा निवडणूक दिवाळीआधी होणार की नंतर, याबाबत निवडणूक आयोगच ठरवणार असला तरी, निवडणुकीआधी मात्र आपले तिकीट पक्के करण्यासाठी विविध नेत्य

यश जाजू सी.ए. परीक्षा उत्तीर्ण
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक
 मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे निव्वळ टाईमपास

मुंबई ः विधानसभा निवडणूक दिवाळीआधी होणार की नंतर, याबाबत निवडणूक आयोगच ठरवणार असला तरी, निवडणुकीआधी मात्र आपले तिकीट पक्के करण्यासाठी विविध नेत्यांकडून पखांतर होतांना दिसून येत आहे. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीवर आमदार जितेश अंतापूरकर म्हणाले की, मी ई-पिक पाहणी अहवाला संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. आमच्याकडे शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मला मुख्यमंत्री यांनी वेळ दिली होती. त्यामुळे मी भेट घेतली. राजकीय चर्चा केली नाही, अशी माहिती जितेश अंतापुरकर यांनी दिली. मी काँग्रेससोबत होतो आणि काँग्रेससोबतच राहणार आहे. मला उमेदवारी मिळणार आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे हिरामण खोसकर यांनी सांगितले आहे. विधानपरिषद निवडुकीत काँगे्रसची मते फुटल्यानंतर काँगे्रसचे पाच आमदार हायकमांडच्या निशाण्यावर होते. या आमदारांना विधानसभेचे तिकीट देवू नये असे निर्देशच हायकमांडने महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसला दिले आहे. त्यामुळे या आमदारांचे पक्षांतर करण्यासाठी गाठीभेटी सुरू असल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणार्‍या आमदारांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. या आमदारांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता काँग्रेस हायकमांडने क्रॉस व्होटिंग करुन गद्दारी करणार्‍या या आमदारांबाबत एक वेगळीच चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. क्रॉस व्होटिंग करणार्‍या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश  काँग्रेस हायकमांडने दिले आहेत.

COMMENTS