Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करा

माजी आमदार वैभवराव पिचड यांचे प्रशासनाला निर्देश

अकोले : तालुक्यात ढगफुटी झाल्याने मुळा व भंडारदरा पाणलोट क्षेत्रात बांध बंदिस्त, घरांचे, शेतीचे मोठे नुकसान झाल्याने माजी आमदारांनी या अतिवृष्टी

श्रीरामपूर-शेवगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने
रस्त्यावर भांडणे करू नका म्हटल्याच्या रागातून विनयभंग
चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

अकोले : तालुक्यात ढगफुटी झाल्याने मुळा व भंडारदरा पाणलोट क्षेत्रात बांध बंदिस्त, घरांचे, शेतीचे मोठे नुकसान झाल्याने माजी आमदारांनी या अतिवृष्टी भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून त्यांनी शेतकर्‍यांना धीर दिला तर महसूल व शेती विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. संगमनेर विभागाचे प्रांत, कृषी विभागाचे विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी याबाबत तलाठी, कृषिसहायक, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी माजी आमदार वैभव पिचड यांनी अतिवृष्टी दौरा केला यानी मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, सम्राद, घाटघर, शिंगणवाडी, उडदावणे, पांजरे याठिकाणी भेट देत पाहणी केली.
गेले चार-पाच दिवसापासून सतत पडत असणार्‍या मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसामुळे आदिवासी भागातील भात शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. मोठ्या प्रमाणावर बांध फुटले आहेत, शेळया दगवल्या आहेत.परिसरात घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. 3 त े4 दिवस त्या भागात लाइट नसून मोबाइल नेटवर्क पण नाही, आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत शासकीय सेवा पूर्ण पुणे विस्कळीत झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मागील आठवड्यांपासून जोरदार पावसामुळे पुनर्लागवड केलेल्या भात पिकांचे व परिसरातील भाताचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच रविवारी पडलेल्या पावसामुळे भात शेतीचे बांध तुटले आहेत. रतनवाडी येथील शेतकरी महादू कोकाटे यांच्या भातशेतीचा बांध पावसाच्या पाण्याने तुटला. पंधरा फूट खोल व आठ फूट रुंद असा बांध तुटला आहे. यामुळे त्यांच्या व त्यांच्या बांधाखाली भात शेती असणार्‍या शेतकर्‍यांच्या भात शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच मागील पंधरा दिवसांपासून पाऊस पडायचा बंद झालाच नाही. त काही ठिकाणी भात पिके वाहून जाऊन भाताचे चोथे विरळ झाले. खताची मात्रा देण्यास उशीर होत आहे. जास्त दिवस भातपीक पाण्याखाली राहिल्यास भातपीक पिवळे पडणार असून पाण्याने भाताची मुळे कुजून खराब होणार आहेत. परिणामी हेक्टरी उत्पादन घटणार आहे. शेतकर्‍यांचे भात पिके गेली बांध बंदिस्त फुटली घरे पडली शेळ्या जनावरे दगावली त्यामुळे भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मोठे नुकसान झाले असून माजी आमदार वैभव पिचड यांना व्यथा सांगितल्या आहेत. एका दिवसात 19इंच म्हणजे 275मिलिमीटर पाऊस झाला गेल्या 100वर्षात असा पाऊस कधी झाला नाही असे इथली नव्वदी पार केलेल्या वृद्धांनी  सांगितले तर त्यात शेतकर्‍यांची भात शेतीची मोठी नुकसान झाली असून बांध फुटून पेरणी केलेले भात वाहून गेले आहे  पिचड यांनी या भागाला भेट देऊन महसूल विभाग, कृषी अधिकारी यांना नुकसानीची माहिती देऊन पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली असून अधिकारी सतर्क झाले आहेत याप्रसंगी दगडू पांढरे पाटील, संपत झडे, सोमनाथ झडे, एकनाथ सारुकते  भास्कर पाटील, नरहारी ईदे सागर रोंगटे, देवराम ईदे, आशोक भागंरे, मारूती बांडे, शुभाष बांडे, काळू प्रकाश खडके, संतोष खडके, लक्ष्मण गांगड, निवृती पोकळे, शंकर खडके हिरामण सोनवणे, ऊडदावने बंच्चू गांगाड, शांताराम गीर्‍हे, पांडूरंग गीर्‍हे, अशोक उघडे, उल्हजी मधे, भरत उघडे, हे शेतकरी एकत्र येऊन त्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

COMMENTS