नवी दिल्ली : पाकिस्तानी जिहादी दहशतवादी संघटना आगामी 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनाला ड्रोन हल्ल्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती सुरक्षा संस
नवी दिल्ली : पाकिस्तानी जिहादी दहशतवादी संघटना आगामी 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनाला ड्रोन हल्ल्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती सुरक्षा संस्थांना मिळाली. यापार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा चौक्या आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला. यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह जिहादी दहशतवादी संघटना मोठ्या हल्ल्यांची योजना आखत आहेत.
काश्मीरपासून दिल्लीपर्यंतच्या सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद्यांच्या धोक्यामुळे गेल्या आठवड्यांत हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गुप्तचरांच्या माहितीनुसार, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा भरलेल्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पंजाब आणि जम्मू -काश्मीरमधील सुरक्षा दलांनी गेल्या महिन्यात अनेक ड्रोन अडवले जेव्हा ते शस्त्र पुरवण्याचा प्रयत्न करत होते. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार दहशतवादी छोट्या शस्त्रांचा वापर वैयक्तिक लक्ष्यासाठी करु शकतात. तसेच देशात एक विशेष प्रकारचा आयईडी पुरवला गेला आहे, ज्याचा वापर सार्वजनिक ठिकाणी स्फोटांसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे धोका पाहता, जीआरपी, स्थानिक पोलीस, निमलष्करी दल आणि राज्य गुप्तचर अधिकार्यांना संशयास्पद वस्तू हाताळताना सतर्क राहण्यास सांगितले आहे.तसेच पाकव्याप्त काश्मिरातून जिहादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि सुरक्षा चौक्यांना लक्ष्य करू शकतात, अशी माहिती देखील पुढे आलीय. जैशचे पाच दहशतवादी बालाकोट ओलांडून पीओकेमध्ये दातोटेमध्ये तळ ठोकून आहेत, जे सुरक्षा दलांच्या पुढच्या ठिकाणांजवळ आयईडी स्फोटाची योजना आखत आहेत. तसेच लष्करचे चार दहशतवादी घुसखोरी करण्याच्या विचारात आहेत आणि सध्या ते पीओकेच्या टंडवाला जंगल परिसरात तळ ठोकून आहेत आणि नंतर ते काश्मीर खोर्यात जाऊ शकतात, अशी माहिती देखील गुप्तचर संस्थांना मिळाली.
COMMENTS