Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळमधील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी

अकोले ःअकोले तालुक्यात कोतुळ येथे अण्णा भाऊ साठे नगर येथील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या  ठिकाणच्या अवैध द

आंदोलनकर्त्या एसटी वाहकाचा नगरमध्ये हृदयविकाराने मृत्यू
पाण्याचा प्रश्‍न सुटल्याने खडकीच्या महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश
रेनबो स्कूलचा सीबीएसईचा 100 टक्के निकाल

अकोले ःअकोले तालुक्यात कोतुळ येथे अण्णा भाऊ साठे नगर येथील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या  ठिकाणच्या अवैध दारूने अनेक दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक गोर-गरीब कुटुंबाचा संसार देशोधडीला लागत असून दारुच्या नशेने  अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवैध दारूने गावातील शांतता बिघडण्याचे काम सुरू केले आहे, असे असतांनाही अकोले पोलिस व दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे.
या बाबत अनेकदा ग्रामपंचायतीने सुचना देऊनही या अवैध दारु विक्रीबाबत त्यांचे डोळे उघडले नाही. त्यामुळे दिवसभर मजूरी करणारे शेतकरी मजूर रात्रीला सहजरित्या दारु मिळत असल्याने दारुच्या आहारी जाऊन दिवसभराची मजूरी वाया घालवीत आहेत. कोतुळ येथील अवैध्य बेकायदेशीर दारु विक्री यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एसटी बसस्थानकासमोरच हा व्यवसाय खुले आम सुरू आहे.  गावातील व खेड्यातील महीलांना आई-बहीणी याचा त्रास सहन करावा लागत आहे.  एका दिवसाला किमान  20 ते 25 बॉक्स दारूचे विक्री होत असल्याचे दिसून येते. यातून मिळणार्‍या अवैध कमाईचा हिस्सा काही पोलीस व दारूबंदी उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना जात असल्याने प्रत्येक वेळी जुजबी कारवाई करून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करत आहे. पोलिसांच्या आशीर्वादातून हे व्यवसाय सुरू असल्याने या व्यवसायिकांची मुजोरी वाढत चालली आहे. यावर वेळीच आवर न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS