Homeताज्या बातम्यादेश

आठशे रूपयांसाठी तिसर्‍या मजल्यावरून फेकले खाली

पाटणा ः बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात अवघ्या 800 रुपयांच्या थकबाकीसाठी एका मजुराची हत्या करण्यात आली. झंझारपूरच्या बेलाराही भागात ही घटना घडली. मायक

साखर उद्योगाबाबत शाश्‍वत धोरणाची गरज ः आ. आशुतोष काळे
कोल्हापूर सर्किट बेंचबाबत मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करणार : मुख्यमंत्रीे
मध्य रेल्वेच्या 11 कर्मचार्‍यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

पाटणा ः बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात अवघ्या 800 रुपयांच्या थकबाकीसाठी एका मजुराची हत्या करण्यात आली. झंझारपूरच्या बेलाराही भागात ही घटना घडली. मायक्रोफायनान्स कंपनीच्या मॅनेजरने मजूर झोताई मंडल (वय, 51) यांना तीन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकल्याचा आरोप आहे. यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. झोताईंनी मॅनेजरकडे त्याच्या मेहनतीसाठी आणि हक्कासाठी 800 रुपयांची मागणी केली होती. यामुळे संतापलेल्या मॅनेजरने छतावरून फेकून त्याची हत्या केली. हत्येनंतर झंझारपूर रुग्णालयात प्रचंड गर्दी जमली आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हाणी, अशीही मागणी केली जात आहे.

COMMENTS