टोकियो ः जपानमध्ये गुरूवारी तब्बल 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानच्या क्युशू बेटावर भूकंपाचा केंद्रब
टोकियो ः जपानमध्ये गुरूवारी तब्बल 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानच्या क्युशू बेटावर भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 8.8 किमी खाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मियाझाकी, कोची, ओटा, कागोशिमा आणि इहिमे शहरांसाठी सुनामीचा सल्ला जारी करण्यात आला आहे. जपानच्या हवामान विभागाने भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल नोंदवल्या गेली आहे. भूकंपाचा केंद्र बिंदु जपानच्या दक्षिण मुख्य द्वीप क्यूशूच्या पूर्व किनारपट्टीवर जवळपास 30 किमीवर अंतरावर नोंदवला गेला. हवामान विभागाने क्यूशूच्या दक्षिण किनारपट्टी व जवळपासच्या भागात तब्बल 1 मीटर उंच लाटा येण्याची भीती व्यक्त केली आहे. भूकंपामुळे त्सुनामी देखील आली आहे, जी पश्चिम मियाझाकी प्रांतात पोहोचली आहे. जपान सरकारने भूकंपाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष टास्क फोर्स तयार केले आहे., भुकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
COMMENTS