Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑलिम्पिक पदकवीर स्वप्नील कुसळेचे जल्लोषात स्वागत

पुणे ः पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने  50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पह

सोनेवाडी विविध कार्यकारी सोसायटीवर पांडुरंग काळे व संपत दळवी बिनविरोध
शाळा कॉलेजच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 264 उमेदवार रिंगणात

पुणे ः पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने  50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने अंतिम फेरीत 451.4 गुणांसह कांस्यपदक जिंकले. पॅरिसमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर स्वप्नील गुरूवारी महाराष्ट्रातील पुण्यात पोहोचला. यावेळी पुण्यात त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुण्यात आल्यानंतर स्वप्नीलने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी त्याने आपले पदक गणपतीच्या चरणी ठेवून त्याचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्याचे पुणे विमानतळ व पुणे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी गणपतीची आरती करत त्याने आपले पदक गणरायाच्या चरणी ठेवले.
फायनलमध्ये स्वप्नील कुसळे पहिल्या स्टँडिंग सीरीजनंतर चौथ्या स्थानावर होता. यानंतर नीलिंगमध्ये त्याचा पहिला शॉट 9.6 असा होता पण नंतर त्याने शानदार पुनरागमन केले. यानंतर, तो 10.6 आणि 10.3 गुणांसह दुसर्‍या स्थानावर पोहोचला, परंतु पुढील दोन शॉट्स 9.1 आणि 10.1 असे होते, ज्यामुळे तो चौथ्या स्थानावर घसरला. त्यानंतर 10.3 गुण मिळवून तो तिसर्‍या स्थानावर पोहोचला आणि शेवटपर्यंत कायम राहिला. नीलिंग पोजिशननंतर तो सहाव्या स्थानावर होता पण प्रोननंतर तो पाचव्या स्थानावर आला. गेल्या 12 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या कुसळेला ऑलिम्पिक पदार्पणासाठी तब्बल 12 वर्षे वाट पाहावी लागली. धोनीइतकाच ’कूल’ असलेल्या कुसळेने क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या कर्णधारावर आधारित चित्रपट अनेकदा पाहिल्याचे सांगितले. स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरचा आहे. 6 ऑगस्ट 1994 रोजी जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. त्याचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने 12वीच्या परिक्षेवर पाणी सोडले होते. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

COMMENTS