Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीजपंप चोरणारे आरोपी अटकेत

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील घोरपडवाडी येथील तीन शेतकर्‍यांच्या शेतातून ठिबक सिंचनचे पाईप व वीजपंपाची चोरी करणार्‍या एका

 श्रीरामपूर मध्ये महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक
राजूर प्रकल्पातील 22 आश्रम शाळांचा शंभर टक्के निकाल
झाड तोडताना मध्ये आल्याच्या रागातून दोन  महिलांना कोयत्याने मारून धमकी  

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील घोरपडवाडी येथील तीन शेतकर्‍यांच्या शेतातून ठिबक सिंचनचे पाईप व वीजपंपाची चोरी करणार्‍या एका चोरास मुद्देमालासह पकडण्यात आहे. या चोरांकडून 30 पाईप व 22 हजार रुपये किमंतीचे विजपंप आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे.
        याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मल्हारवाडी येथिल घोरपडवाडी शिवारात भोजराज भानुदास गाडे यांच्या शेतातुन 6 जुलै राञीच्या दरम्यान ठिबक सिंचनासाठी जोडलेले 30 पाईप अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. 23 जुलै रोजी रात्री000  अशा बापूरावजी येळे, रेवन तुळशीराम हापसे, पोपट काशिनाथ थोरात यांच्या विहिरीतील विजपंप व पाणबुडी पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेले.यासंदर्भात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली मिळालेल्या माहितीची खाञी करुन घेतली असता सोमनाथ यादव बर्डे (रा. केकताई वस्ती चिंचाळे) याने चोरी केल्याची खाञी झाल्यावर सोमनाथ बर्डे यास अटक करुन अधिक तपास केला असता. बर्डे याने चोरुन नेलेले पाईप बटाईने करीत असलेल्या शेतातून काढुन दिले.सहाय्यक फौजदार औटी यांनी 30 पाईप जप्त केले.अधिक तपास केला असता 22 हजार रुपये किमंतीचे विजपंप व पाणबुडीपंप आरोपी काढुन दिले.पाईप व विजपंप चोरी करणार्‍या बर्डे याचे साथीदार फरार झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे,उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार औटी, तपास पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, पोलिस नाईक प्रवीण  बागुल, गणेश सानप, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले, सतीश कुर्‍हाडे यांनी केली.

COMMENTS