Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचित शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्यांसाठी लढा देणार ः प्रा. चव्हाण

शेवगाव तालुका ः वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या न

बनावट दस्तऐवज करून प्लॉटची परस्पर विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा
पोलिस तपास थंडावला…‘विद्युत’च्या अहवालाची प्रतीक्षा
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा

शेवगाव तालुका ः वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात आले या प्रसंगी सोपानराव काळे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, रवींद्र निळ, युवा तालुका अध्यक्ष सागर गरूड, सचिन कणसे, अवधूत केदार, दत्तात्रय औटी, बाबासाहेब थोरात, गहीनिनाथ कातकडेसर, वसंत औटी, सचिन शिंदे, अशोक कापरे,अन्सारभाई कुरैशी, साईनाथ भागवत, व इतर शेतकरी बांधव व व्यवसाईक उपस्थित होते
        यावेळी प्रा किसन चव्हाण म्हणाले की, शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील ज्यांची शेअर मार्केट मध्ये फसवणूक झाली असेल त्यांनी न घाबरता धाडसाने पुढे येऊन कुणाच्याही दबावाखाली न जाता, बुधवार 7 ऑगस्ट  रोजी शेवगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी उपस्थित रहावे शेवगाव पोलिस स्टेशन येथे शेअर मार्केट मध्ये फसवणूक करणार्‍या व्यक्तींच्या तक्रारी न घेणार्‍या शेवगाव पोलीस निरीक्षक तसेच पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे तसेच गेल्या पाच सहा महिन्यांत बर्‍याच व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत या संकटातून वाचण्यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहनही प्रा किसन चव्हाण यांनी केले या बाबत मा मुख्यमंत्री,मा गृहमंत्री,मा पोलीस महासंचालक नासीक,मा पोलिस अधीक्षक अहमदनगर, यांना इमेल द्वारे लेखी निवेदन देण्यात आले आहे

COMMENTS