Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या अध्यक्षपदासाठी फडणवीस शर्यतीत !

मुंबई ः भाजपमध्ये एक पद एक व्यक्तीचा फॉर्म्युला असल्यामुळे आणि भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकउे आरोग्यमंत्री पदाची धुरा असल्यामुळे

शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान…
समृद्धी महामार्ग विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे
ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई ः भाजपमध्ये एक पद एक व्यक्तीचा फॉर्म्युला असल्यामुळे आणि भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकउे आरोग्यमंत्री पदाची धुरा असल्यामुळे लवकरच नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. मात्र नवा अध्यक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विश्‍वासातील तर दुसरीकडे त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचा देखील असावा म्हणून या शर्यतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे समोर येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यामुळे फडणवीस लवकरच अध्यक्षपदावर विराजमान होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. जर फडणवीस यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्यास नितीन गडकरी यांच्यानंतर अध्यक्षपदी विराजमान होणारे फडणवीस महाराष्ट्रातील दुसरे नेेते असतील. 2014 पासून राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी फडणवीस यांनी केलेल्या कुटनीती आणि रणनीतीचा भाजपला विशेष फायदा झाला होता. 2019 मध्ये देखील भाजपने निर्भेळ यश मिळवले होते. मात्र 2024 मध्ये भाजपला यश मिळवता आले नव्हते. त्यातच फडणवीस यांनी सत्तेतून बाहेर पडत आपल्या पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले होते.

मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात फडणवीस यांच्यासारखा कूटनीतीतील चाणक्य आणि अभ्यासू व्यक्ती इतर दुसरा नसल्यामुळे फडणवीस यांची अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. फडणवीस आतापर्यंत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कसोटीवर खरे उतरलेत. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार निकाल आल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचीही तयारी दर्शवली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर त्यांचे सुगीचे दिवस आल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे. फडणवीस हे भाजप अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य व फिट उमेदवार मानले जात आहेत. कारण, त्यांचे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशीच चांगले संबंध नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (आरएसएस) त्यांच्या नावावर कोणताही आक्षेप नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचे खूप चांगले व जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

COMMENTS