Homeताज्या बातम्यादेश

कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू

राजधानीतील आयएएस कोचिंग सेंटरमधील घटना

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील जुना राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या

बेलापूर येथील 126 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात
एकनाथ खडसेंना घरवापसीची ऑफर
पाथर्डीत ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील जुना राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोन विद्यार्थीनींचा समावेश आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून मृतांचा आकडा 8-9 सांगण्यात येत असून, मृतांचा आकडा दाबण्यात येत असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून बेसमेंटमध्ये आणखी लोक अडकल्याची भीती अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, दिल्ली पोलिस आणि नागरी यंत्रणांचे कर्मचारी बचावकार्यात गुंतले असून, शनिवारी रात्री उशिरा तिघांचे मृतदेह सापडले, ज्यांची ओळख आणि वय अद्याप समजू शकलेले नाही. दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, अग्निशमन नियंत्रण कक्षाला सायंकाळी सात वाजता या घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने आणि संस्थेबाहेरील रस्ताही पाण्याखाली गेल्याने पाणी साफ करणे अवघड झाले होते. संस्थेच्या मालकाने आम्हाला तीन ते चार विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती दिली एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांची पथकेही बचावकार्यात सहभागी झाली आहेत, असे गर्ग यांनी सांगितले. बेसमेंटमधील संपूर्ण पाणी बाहेर काढल्यानंतरच पूरग्रस्त बेसमेंटमध्ये आणखी विद्यार्थी अडकले आहेत की नाही याची खात्री होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी सायंकाळी लिहिलेल्या पत्रात त्यांनी मुख्य सचिवांना मॅजिस्ट्रेट चौकशी करून 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.  या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दंडाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही,’ असे आतिशी यांनी ’एक्स’वर पोस्ट केले आहे. महापौर शेली ओबेरॉय म्हणाल्या, आमदार दुर्गेश पाठक आणि मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. अचानक एक नाला फुटला, ज्यामुळे ही घटना घडल्याचे दिसत आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही सर्वांना आश्‍वासन देतो की, याला जो कोणी जबाबदार असेल, मग तो एमसीडी असला तरी कारवाई केली जाईल. दरम्यान, खासदार बांसुरी स्वराज यांच्यासमवेत घटनास्थळी उपस्थित असलेले दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, ही घटना नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे झालेल्या निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण आहे. नाल्याचे पाणी अत्यंत वेगाने कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये शिरले आहे, असे सचदेवा यांनी सांगितले.

COMMENTS