Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

मुंबई ः विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांनी रविवारी आपल्या पदाची शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सदस्यांना शपथ दिली

निर्णय प्रक्रियेतून डावलल्यामुळेच शिंदे यांचे बंड
फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी विश्‍वजितराजे नाईक-निंबाळकर; उपसभापतीपदी संजय सोडमिसे बिनविरोध
आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण

मुंबई ः विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित सदस्यांनी रविवारी आपल्या पदाची शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सदस्यांना शपथ दिली आहे. सकाळी विधानपरिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडला आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, तर शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाने, अजित पवार गटाकडून शिवाजी गर्जे, राजेश विटेकर, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना शपथ देण्यात आली आहे. शपथविधीवेळी भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असे म्हटले आहे. तर ठाकरे गटाचे नवे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेत असताना बाळासाहेबांना नमन करून आपल्या शपथविधीला सुरूवात केली आहे. तर आपल्या शपथविधीच्या शेवटी त्यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराचे देखील आभार मानले आहेत.

COMMENTS