Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुख-फडणवीस आरोप-प्रत्यारोपांचा वाद चिघळणार

हिंमत असेल तर क्लिप्स जनतेसमोर आणाव्यात ः देशमुख

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून चांगल्याच आरोप-प्रत्यारोपांच्या फैर

राज्यात सत्तेसाठी दंगलीचा घाट : संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
मोकळ्या जागेवर कर लावण्याच्या ठरावाचा तात्काळ अहवाल द्या; कराड पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आयुक्तांचा दणका
लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून चांगल्याच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसून येत आहे. देशमुख यांना 100 कोटींच्या आरोपांनंतर तब्बल 13 महिन्याचा तुरुंगात काढावी लागल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. मात्र हा तुरुंगवास फडणवीस यांच्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप देशमुख यांचा आहे. त्याला प्रत्युत्त देत देशमुखांच्या काही क्लिप्स माझ्याकडे आहेत, त्या समोर आणल्यास त्यांच्या अडचणी वाढतील असा इशारा फडणवीस यांनी दिला होता.
फडणवीस यांच्या इशार्‍यानंतर गुरूवारी देशमुख यांनी देखील त्या क्लिप्स जनतेेसमोर आणाव्यात असे प्रति आव्हान दिल्यामुळे दोघांतील कलगीतुरा चांगलाच रंगतांना दिसून येत आहे.  याची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून झाली. मानव यांनी त्या पत्रकार परिषदेत देशमुख यांच्या चुकीच्या अटकेवरही भाष्य केले होेते. अनिल देशमुख यांनी मानव यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी एका माणसाच्या करवी मला ऑफर दिली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार व अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितले होते. त्या बदल्यात ईडीच्या अटकेपासून संरक्षण देऊ असे सांगितले होते. मात्र, हे खोटे काम करण्यास स्पष्ट नकार दिला आणि जेलमध्ये जाणे पसंत केले, असे देशमुख म्हणाले. फडणवीसांनी पाठवलेला माणूस कोण होता व त्यांनी काय प्रतिज्ञापत्रे दिली होती, या सगळ्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. देशमुख यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. उलट, अनिल देशमुख यांच्याच विरोधात माझ्याकडे  काही व्हिडिओ आहेत. त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी ते मला आणून दिले आहेत. त्यात ते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय-काय बोलले आहेत ते सगळे आहे. वेळ आल्यास मी ते जाहीर करेन, असे फडणवीस म्हणाले होते.

माझ्याकडे पुराव्याचा पेन ड्राइव्ह ः देशमुख – उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान देतांना अनिल देशमुख म्हणाले की, फडणवीसांच्य इशार्‍याला फार महत्त्व देत नाही. मी शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोललो याचे पुरावे असतील तर त्यांनी उघड करावेत. लोकांसमोर आणावेत, असे माझं जाहीर आव्हान आहे, असे देशमुख म्हणाले. त्याचवेळी, देशमुख यांनी फडणवीस यांच्या विरोधातील पुराव्यांचा पेन ड्राइव्ह देखील दाखवत त्यांनी फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले आहे.

COMMENTS