Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या

शिवाजी विद्यापीठाच्या कायद्याच्या अभ्यासक्रमाची परिक्षा पुढे ढकललीसातारा / प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसापासून सातारा-सांगली-कोल्हापूर-पुण

कराड मंडई परिसरात राडा; तलवार हल्ल्यात एक गंभीर
Osmanabad : खुनाच्या आरोपातील आरोपीचा भूम तालुक्यात खून (Video)
जबरदस्तीने वर्गणी मागणार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार : इस्लामपुरात व्यापारी महासंघाचा निवेदनाद्वारे इशारा

शिवाजी विद्यापीठाच्या कायद्याच्या अभ्यासक्रमाची परिक्षा पुढे ढकलली
सातारा / प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसापासून सातारा-सांगली-कोल्हापूर-पुणे जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवल्याने परिसरात ओढे-नाले-नद्यांना आलेल्या महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास होवू नये म्हणून पुण्यापाठोपाठ सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त महाविद्यालयात कायद्याच्या अभ्यासक्रमाच्या परिक्षाही काही दिवसासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाळ्याच्या प्रारंभी दमदार पाऊस झाला होता. मात्र, पश्‍चिम भागात पावसाचा शिडकावही झाला नव्हता. पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर जाणार्‍या लोकांना मोसमी पावसामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, पश्‍चिम भागातील बागायती पट्ट्यात पाऊस न पडल्याने शेतीच्या मशागतीची कामे रखडली होती. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात दमदार पावसाने हजेरी लावली होती. गेल्या आठ दिवसापासून सातारा, सांगली, पुणे, मुंबई, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना, कृष्णा, वेण्णा या नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कोयना, कन्हेर या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना महापूराचा धोका निर्माण झाला आहे.
सातारा-सांगली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वारणा नदीवर वारणावती येथे बांधलेल्या चांदोली धरणाच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाल्याची नोंद आहे. पाणी पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी चांदोली धरणातून सुमारे 10 हजार क्युसे, कोयना धरणातून 15 हजार क्यूसे तर कण्हेर धरणातून 8 हजार क्युसे पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढतच आहे. त्यामुळे सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी शाळा-महाविद्यालयांना बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच पूरस्थिती लक्षात घेऊन सोमवार, दि. 22 पासून ते शनिवार, दि. 27 या कालावधीत शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील कायद्याच्या अभ्यासक्रमाच्या परिक्षांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे.

COMMENTS