Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी दुहेरी हत्याकांडातील आरोपीची नाशिक कारागृहात रवानगी

देवळाली प्रवरा ः राज्यभर गाजलेल्या राहुरीतील आढाव वकील दांपत्य दुहेरी हत्याकांडातील आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याची परवानगी जि

विखे पिता-पुत्राला धडा शिकविणार
कोपरगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी !
गावे समृद्ध झाली तरच देश महासत्ता होईल – भास्कर पेरे-पाटील

देवळाली प्रवरा ः राज्यभर गाजलेल्या राहुरीतील आढाव वकील दांपत्य दुहेरी हत्याकांडातील आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याची परवानगी जिल्हा सत्र न्यायालयाने दिली आहे. राहुरी तालुक्यातील आढाव वकील दांपत्याचा दुहेरी हत्याकांड राज्यभर गाजले. दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात गुरंनं.75/2024 नुसार दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयात खटला क्रमांक. 126/2024 सुनावणी सुरु आहे. या गुन्ह्यातील आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग, भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत महाडीक, बबन सुनील मोरे यांना सरकारी वकील उज्वल निकम यांच्या मार्फत न्यायालयाकडे खुन खटल्यातील आरोपींना जिल्हा बाहेर वर्ग करण्याची मागणी राहुरी पोलीस व जेल अधीक्षक राहुरी यांनी केली  होती.
                      जिल्हा सत्र न्यायालयाने खून खटल्यातील आरोपींना जिल्हा बाहेर वर्ग करण्याची परवानगी दिल्याने या आरोपींना नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने सदर चारही आरोपींना राहुरी पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे जमा केले आहे. या खून खटल्यातील आरोपी हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने राहुरी सब जेल येथेच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदरची कारवाई माननीय न्यायालयाच्या आदेशाने व पोलीस अधीक्षक  राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कुलूबर्मे, पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पो. हे. बाळासाहेब महंडुळे,पो. ना. संभाजी बडे, उत्तरेश्‍वर मोराळे, पो. कॉ. अंबादास गीते, इफतेखार सय्यद, प्रतीक आहेर आदींनी कामगिरी पार पाडली.

COMMENTS