सातारा / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील वाघजाईवाडी येथे गणपत खाशाबा पवार यांच्या गोठ्याची भिंत पावसामुळे खचून झालेल्या दुर्घटनेत एक म्हैस आणि
सातारा / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील वाघजाईवाडी येथे गणपत खाशाबा पवार यांच्या गोठ्याची भिंत पावसामुळे खचून झालेल्या दुर्घटनेत एक म्हैस आणि रेडकू यांचा मृत्यू झाला. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी प्रशासनाने त्वरित मदत पाठवून देत पडलेल्या भिंतीचा मलबा जेसीबीने हटवला. तसेच जनावरांचे मृतदेह बाहेर काढून, पोस्टमार्टम करून त्यांची विल्हेवाट लावली. या घटनेचा पंचनामा झाला असून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची कारवाई त्वरित करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी सुनील गाडे व तहसीलदार पाटण अनंत गुरव यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधारा कोसळत असल्याने सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत दरड कोसळून रस्ते बंद होणे, जुन्या घरांच्या पडझडीचे प्रकार होत आहेत. पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा कराड तालुक्यात नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयेनेच्या पायथागृहातून पाण्याचा विसर्ग सुरु
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे आज दि. 23 जुलै 2024 रोजी सकाळी 10:00 वा. कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सध्या कोयना धरणात 65 टीएमसी पाण्याचा साठा झाला आहे.
COMMENTS