Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत पुन्हा हिट अ‍ॅण्ड रन

ऑडीच्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी

मुंबई ः मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. ताज्या घटनेत एका भरधाव वेगातील ऑडी कारने 2 ऑटो रिक्षांना धडक दिली असून, त्यात 4 प्रवाशी जा

आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले
पुण्यात पुन्हा हिट अँड रनचा थरार
वरळी, बीडमध्ये ‘हिट अँड रन’च्या घटना

मुंबई ः मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. ताज्या घटनेत एका भरधाव वेगातील ऑडी कारने 2 ऑटो रिक्षांना धडक दिली असून, त्यात 4 प्रवाशी जायबंदी झालेत. या धडकेनंतर ऑडी चालक फरार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंलुंड भागात सोमवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही रिक्षांतील 4 प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. एका ऑडी कारने दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातानंतर ऑडी चालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती मिळत आहे. मुलुंडमध्ये सकाळीच घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेने खळबळ माजली आहे. भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती मिळत आहे. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, चालकाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अपघातात प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. 

COMMENTS