Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांचे नेतृत्व स्वीकारले तरच विकास होणार: हर्षदा काकडे

पाथर्डी ः येणार्‍या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तीन कारखानदार आहेत तर दुसर्‍या बाजुला सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व असून तुम्ही त

तहसील इमारतीने गाठला अस्वच्छतेचा कळस
युवानचे संस्थापक संदिप कुसळकर यांना 5 लाखाचा सेवादीप पुरस्कार
अतिवृष्टीची भरपाई न दिल्यास जलसमाधी घेणार

पाथर्डी ः येणार्‍या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तीन कारखानदार आहेत तर दुसर्‍या बाजुला सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व असून तुम्ही त्याचा स्विकार केला तरच तुमचा विकास होऊ शकतो नसता प्रस्थापित कारखानदार पुढारी तुमचा विकास करू शकणार नाहीत असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीच्या नेत्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांनी गुरूवारी पाथर्डी येथे केले.
पाथर्डीत जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने निर्धार मेळावा व नूतन बांधकाम कामगार संपर्क कार्यालय व जनशक्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव चोरमारे हे होते, तर कार्यक्रमास जगन्नाथ गावडे, ह.भ.प. माऊली महाराज फटांगडे, बोरुडे महाराज, गहिनीनाथ थोरे, बाळासाहेब कचरे, विनायक देशमुख, सचिन  नागापुरे, महेश दौंड, अशोक  मरकड, उबेद आतार, साईराज लांडगे, माणिक गर्जे, धनराज घोडके, सुरेश चौधरी, अशोक ढाकणे, पंडित नेमाने, भगवान डावरे, वैभव पू, अतुल केदार, भागवत भोसले, नामदेव ढाकणे, रामकिसन सांगळे, नितीन कुसळकर, अकबर शेख, माणिक काळे, मधुकर गोरे, लक्ष्मण टाकळकर, भागचंद आठरे, सुरेश कुठे, रंगनाथ ढाकणे, अशोक शिरसाठ, नामदेव कसाळ, संजय काकडे, सचिन आधाट, विष्णू दिवटे, राजेंद्र पोटफोडे, भारत लांडे, चंद्रकांत गायकवाड, गणेश गर्जे, रमेश दिवटे, गणेश उगले, देविदास गिर्‍हे, आदी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी अ‍ॅड.शिवाजी काकडे म्हणाले की, शरद पवार साहेबांनी दहिगावकरांना सर्व पदे दिली. कारखाना, जिल्हा बँक,आमदारकी, राज्य बँक,जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले तरीही यांनी मा.पवार साहेबांची संकटात साथ सोडली. अहो ज्या पवार साहेबांनी एवढे देऊनही हे त्यांचे होऊ शकले नाही ते तुमचे आमचे गरिबांचे काय होणार. त्यामुळे जनतेने आता त्यांना ओळखलं आहे.आता हर्षदा काकडे यांना दोन्ही तालुक्यातून व्यापक प्रमाणात सर्व जाती-धर्माचा, गोरगरिबांची साथ मिळत आहे. त्यामुळे आता या प्रस्थापित मातब्बरांना जनता घरी बसवणार असून सौ.हर्षदा काकडे यांच्या नवीन चेहर्‍याला विधानसभा निवडणुकीत संधी देणार हे निश्‍चित आहे. यावेळी लक्ष्मण गवळी, जगन्नाथ गावडे, ज्ञानेश्‍वर फटांगडे, माणिक गर्जे, सचिन भादापुरे, विनायक देशमुख गुरुजी, सुनील चव्हाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागचंद कुंडकर यांनी सूत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी तर आभार अशोक पातकळ यांनी मानले.

COMMENTS