Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसच्या त्या आमदारांची ओळख पटली

फुटलेल्या आमदारांची होणार पक्षातून हकालपट्टी

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत काँगे्रसचे मते फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्या गद्दार आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा काँगे्रसचे प्रदेश

निर्बंध लादणारा फतवा
कराड आगारातील चालकाचा हृदय विकाराने मृत्यू
गंगापूर रोडवर दोन कारचा भीषण अपघात 

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत काँगे्रसचे मते फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्या गद्दार आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. क्रॉस व्होटिंग करणार्‍या 8आमदारांची अखेर काँग्रेसला ओळख पटवण्यात यश आले आहे. त्यात मराठवाड्यातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 व मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. त्यांच्यावर आठवड्याभरात कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी होणार असून त्यामध्ये फुटलेल्या आमदारांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

क्रॉस व्होटिंग करणार्‍या आमदारांत मराठवाड्यातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 तथा मुंबई व विदर्भातील प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी यासंबंधीचा अहवाल दिल्लीला पाठवला आहे. फुटीर आमदारांवर आता कारवाई केली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका सहन करावा लागेल, अशी भीती या नेत्यांनी आपल्या अहवालात केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांवर पुढील आठवड्याभरात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली, त्यांना सोडला जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. जे घडले ते वरिष्ठांना कळवले आहे, त्यांच्याकडून भेटायला बोलावले जाईल. किती लोक फुटले याचा आकडा येईल. आमचा सगळ्या आमदारांवर विश्‍वास होता, पण ह्या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्‍वासघात केला. आम्ही जी स्टेटर्जी केली, त्याला देखील हे लोक वागले नाहीत. त्यांना पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल, असा इशारा पटोले यांनी दिला. घोडाबाजर करणारी लोक भाजपची आहेत, पण जनतेच्या दालनात हे आता उतरणार आहेत.

आम्ही ह्या आधी सांगत होतो की, हे लोक राज्याला लुटत आहेत, कर्जबाजरी केले आहे. ह्या लोकांनी महागाई केली आणि जनता ह्या लोकांना माफ करणार नाही,  कॅगचा तसा रिपोर्ट आहे. भाजपच्या लोकांना निवडून दिले, पण ह्या लोकांना कसा काळिमा लावला हे नागरिकांनी पाहिले. भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैश्यावर बोलत आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.  मागील 10 वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर दिल्लीला दिला जातो असे असतानाही राज्याला परतावा देताना भेदभाव केला जातो हे उघड असताना मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्‍वासन फसवे वाटत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली फेकाफेकी आहे, असे पटोले म्हणाले.

पक्षातील कचरा साफ होईल ः वडेट्टीवार – लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर असल्याचे दाखवून दिले. पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली. आम्हाला हे बेइमान शोधून काढायचे होते. त्यामुळेच काँग्रेसने विधान परिषद निवडणूक लढवली. आता पक्षातील कचरा साफ होईल. कालच्या निकालानंतर घरभेदी शोधण्यात आम्हाला यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल देण्यात आला असून, त्यांच्यावर निश्‍चित कारवाई होईल, असेही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

क्रॉस व्होटिंग करणारे आमदार
झिशान सिद्दीकी
सुलभा खोडके
शिरीष चौधरी
हिरामण खोसकर
जितेश अंतापूरकर
मोहन हंबिर्डे 

COMMENTS