Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीमध्ये सिटी बसने चौघांना चिरडले

9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

अमरावती: राज्यभर हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना समोर येत असतांनाच रविवारी अमरावती शहरामध्ये एका सिटी बसने चौघांना चिरडण्याची घटना घडली आहे. सीटीबसने रस्त

आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो… राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा
इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल महागल्याने वाहनधारक आणि नागरिक हैराण
वादानंतर पत्नीलाच कारखाली चिरडले; बारामती येथील दाम्पत्यांचे कर्नाटकात येथील वादातून हत्या

अमरावती: राज्यभर हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना समोर येत असतांनाच रविवारी अमरावती शहरामध्ये एका सिटी बसने चौघांना चिरडण्याची घटना घडली आहे. सीटीबसने रस्त्यावरून जाणार्‍या चौघांना चिरडले. या भीषण अपघातात 9 वर्षीय मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने या बसची तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत प्रीतम गोविंद निर्मळे (वय 9) या मुलाचा बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर नर्मदा निर्मळे (वय 60) तर वैष्णवी संजय निर्मळे (वय 14), नेहा संतोष निर्मळे हे तिघे या अपघातात गंभीर जखमी झाले असून तिघांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे. नागरिकांचा संताप पाहता सायन्सकोर मैदानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळच्या सुमारास शिरसगाव कसब्यातील रहिवासी असलेल्या एक नर्मदा निर्मळे या त्यांचा नातू आणि दोन नातीनसोबत सायन्स कोर्सच्या बस डेपो परिसरातून रस्त्याने जात होत्या. यावेळी अमरावती शहरात असणार्‍या भरधाव सीटीबसने या चौघांना जोरदार धाड दिली. यात प्रीतम हा बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर आजी व दोन नाती या गंभीर जखमी झाल्या.

COMMENTS