Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरपंचाचा शेतकर्‍यावर तलवारीने हल्ला

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकर्‍यावर संरपंचाने तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा रागात

50 युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान
एका विषयाचे दोन सोबती !
solapur : काँग्रेस पक्षाच्यावतीने मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयासमोर आंदोलन (Video)

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकर्‍यावर संरपंचाने तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा रागात सरपंचाने शेतकर्‍यावर थेट तलवारीने हल्ला केला आहे. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. शेतीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून दोन्ही कुटुंबात पूर्वीपासून वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. सरपंचाने ड्रोनच्या सहाय्याने शेतात फवारणी केल्याने या शेतकर्‍याच्या सव्वा एकरातील भेंडी जळाली होती. याची शेतकर्‍यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांना तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून सरपंचाच्या कुटुंबातील चौघांनी शेतकर्‍यावर तलवारीने हल्ला केला.

COMMENTS