Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत युनीयन बँकेला आग

हिंगोली : हिंगोली येथील पोस्ट ऑफीस रोड भागातील युनीयन बँकेला शुक्रवारी सकाळी सात वाजता आग लागली होती. मात्र पालिकेच्या सतर्कतेने आग वेळीच आटोक्या

लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर
पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिंदेंच्या जाहिरातींना फडणवीस समर्थकांचे नांदेडमध्ये प्रत्युत्तर

हिंगोली : हिंगोली येथील पोस्ट ऑफीस रोड भागातील युनीयन बँकेला शुक्रवारी सकाळी सात वाजता आग लागली होती. मात्र पालिकेच्या सतर्कतेने आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र बँकेतील यंत्र जळाल्याने आता बँक कधी सुरू होणार असा प्रश्‍न निर्माण झाला असून बँकेच्या स्थलांतराचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. हिंगोली येथील पोस्ट ऑफीस रोड भागात युनीयन बँकेची शाखा आहे. मागील पंधरा वर्षापासून बँक या ठिकाणी आहे. आज सकाळी सात वाजता बँकेच्या खिडक्यांमधून धुर निघू लागला होता. त्यामुळे बँकेला आग लागल्याचे लक्षात येताच नागरीकांनी तातडीने बँकेचे व्यवस्थापक रमेश राठोड यांना माहिती दिली तसेच पालिकेलाही माहिती देण्यात आली.

COMMENTS