पहिल्यांदाच ५१ गडांवर साजरा होणार ‘शिवराज्याभिषेक दिन’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहिल्यांदाच ५१ गडांवर साजरा होणार ‘शिवराज्याभिषेक दिन’

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमत: राज्यातील तब्बल ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा होणार आहे.

माजी विद्यार्थिनीने 45 वर्षानंतर शाळेप्रती केली कृतज्ञता व्यक्त
फुकरे फेम अभिनेता पुलकित सम्राटने गुपचूप उरकला साखरपुडा
ससेवाडी येथील शेतकर्यांचे मुलं झाले पोलीस

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमत: राज्यातील तब्बल ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा होणार आहे. प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्य घराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे, 

    अशी माहिती ‘गड तिथे शिवराज्याभिषेक दिन ; गड तिथे स्वराज्यदिन’ सोहळ्याचे संकल्पक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारुन पूजन होणार आहे. नुकतेच शिवाजीनगर येथील एसएसपीएम संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्यदिव्य अश्वारुढ स्मारकापाशी असलेल्या जगातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करुन, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचे पूजन करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात पासलकर, जेधे, कंक, बांदल, मालुसरे, शिळीमकर, गोळे, गायकवाड, पायगुडे, मरळ, जगताप, धुमाळ, हाडे, जाधवराव, पवार या स्वराज्यघराण्यातील सदस्यांना भगवा स्वराज्यध्वज गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

COMMENTS