देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील लाख येथील संकेत सुभाष गल्ले यांच्या शेत तळ्यावरील वीजपंप चोरुन नेत असताना तीन चोरट्यांना रंगेहाथ पकडले ग्रामस
देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील लाख येथील संकेत सुभाष गल्ले यांच्या शेत तळ्यावरील वीजपंप चोरुन नेत असताना तीन चोरट्यांना रंगेहाथ पकडले ग्रामस्थांच्या हातून एक चोर निसटुन मोटारसायकल वरुन फरार झाला आहे.पग्रामस्थांनी पकडलेल्या दोन चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.राहुरी पोलिसांनी विज पंप चोरीचा गुन्हा दाखल करुनदोन चोरांना अटक केली आहे. एका चोराचा पोलिस शोध घेत आहे.
याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील लाख गावातील संकेत सुभाष गल्ले यांची शेती असुन या शेतीत एक शेततळे आहे.या शेत तळ्यावर पाणी उपसण्यासाठी एक विजपंप बसविण्यात आला होता.7 जुलै रोजी दुपारी 2 वा.तीन चोरट्यांनी शेततळ्यावरील विजपंप चोरुन शेजारच्या ऊसाच्या पिकात चोरुन ठेवलेला विजपंप गोणीत पोत्यात भरुन रस्त्यावर आणीत असताना संकेत गल्ले याने पाहिले असता. आयुब उर्फ लुण्या नसीर पठाण, सुनिल संजय जाधव, अमोल दत्तू पवार (सर्व रा. मुसळवाडी ता. राहुरी) या तिघांनी विजपंप असलेले पोते मोटार सायकलला बांधले. चोरट्यांना मोटारसायकल वरील पोत्यात काय आहे असे विचारले असता पोत्यातील वस्तू दाखविण्यास नकार दिला.त्या पोत्यात आपलीच मोटार असल्याचा संशय आल्याने त्यांनी मोटार सायकल वर बांधलेल्या गोणीत पाहीले असता संकेत गल्ले यांचीच मोटार असल्याचे त्यांनी ओळखल्याने संकेत गल्ले यांनी त्या तिघांना तुम्ही माझी मोटार का चोरुन घेऊन जात आहेत असे म्हणुन मोटार सायकलवरुन इलेक्ट्रीक मोटार काढुन घेत असतांना त्या तीन चोरट्यांनी संकेत गल्ले यांना मारहान करुन बळजबरीने मोटार घेऊन जाऊ लागले त्यावेळी शेता शेजारील लोक जमा झाल्याने.ग्रामस्थांनी तीन चोरट्याचा पाठलाग केला असता आयुब उर्फ लुण्या नसीर पठान व सुनिल संजय जाधव ( रा.मुसळवाडी) या दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले. तर अमोल दत्तु पवार हा चोरटा मोटार सायकलवर पळुन गेला. संकेत सुभाष गल्ले यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघा चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवस पोलीस कोठडी सुनवण्यात आली. अटक असलेल्या चोरट्यांकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा तपास पोनि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोकॉ. गणेश लिपने करत आहेत. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, साहय्यक फौजदार विष्णु आहेर, पोना. प्रविण बागुल, पोकॉ. प्रमोद ढाकणे, पोकॉ. गणेश लिपने, पोकॉ. नदिम शेख, संतोष राठोड यांनी दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.
COMMENTS