Homeताज्या बातम्यासंपादकीय

ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थ

ब्रिटनमधील अर्थव्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून हेलकावे खातांना दिसून येत आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याजवळ सर्व

विकासांच्या मुद्दयांना बगल
विरोधाभास की उतरती कळा
सरकारी निर्णय राज्यास मारक

ब्रिटनमधील अर्थव्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून हेलकावे खातांना दिसून येत आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याजवळ सर्वोत्तम उपाययोजना नसल्यामुळे हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. अनेक पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदावर वर्णी लागली होती, मात्र तेही आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी फारशी कमाल करू शकले नाही. परिणामी ब्रिटनच्या जनतेत एक असंतोष खदखद करत होता. त्याचाच परिणाम या निवडणुकीतून दिसून आला. त्यामुळेच कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव करत मजूर पक्ष 14 वर्षांनंतर सत्तेत आला आहे. वास्तविक पाहता 14 वर्ष सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाला देशातील राजकीय नाड्या चांगल्याच माहित असतात. मात्र या समस्या समजून घेण्यात ऋषी सुनक कमी पडल्याचे दिसून येत आहे. महागाई प्रचंड वाढत असतांना त्यावर कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. शिवाय देश चालवणे जिकिरीचे होत असल्यामुळेच ऋषी सुनक यांनी सहा महिने आधीच निवडणूका जाहीर केल्याचे दिसून येत आहे. खरंतर ब्रिटनच्या लोकांमध्ये प्रचंड चिवटपणा असतो. त्यामुळे ते शेवटच्या क्षणापर्यंत हार मानत नाहीत. मात्र ऋषी सुनक यांनी निवडणुकीआधीच आपला पराभव मान्य केला होता, असेच त्यांच्या बॉडी लॅग्वेजवरून दिसून येत आहे.

वास्तविक पाहता पाकिस्तान, श्रीलंका, यासह देशातील अनेक अर्थव्यवस्थेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. या देशांच्या अर्थव्यवस्था तर दिवाळखोरीत निघाल्या होत्या. तशी हाताबाहेरची परिस्थिती ब्रिटनच्या हातून गेली नव्हती. तरीदेखील ती परिस्थिती आपण बदलू शकतो, असा विश्‍वास ब्रिटनच्या कोणत्याही पंतप्रधानाला नव्हता, त्यामुळे ब्रिटनपुढे मोठे संकट निर्माण झाले होते. वास्तविक पाहता कोरोनामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या होत्या. त्याला ब्रिटनही अपवाद नव्हता. मात्र कोरोनानंतरच्या काळात अनेक देशांच्या अर्थव्यवस्था सावरल्या असल्या तरी ब्रिटन काही सावरला नाही. त्यातच ब्रिक्सचे भूत आणि त्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्धामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्थेला मोठे हेलकावे खावे लागले. या धक्क्यांतून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कोणत्याच पंतप्रधानांनी पुरेसे प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. याउलट ऋषी सुनक यांच्याकडून ब्रिटनला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्या अपेक्षा पूर्ण करण्यास ते अपयशी ठरले. तर दुसरीकडे ऋषी सुनक यांनी नेहमीच आपला बडेजाव ठेवला. त्यामुळे त्यांना टीकचे धनी व्हावे लागले आहे. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत या संपूर्ण घटनांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा गेल्या दोन वर्षांचा कारभार आणि उलथापालथ पाहता यादरम्यान अनेक वाद निर्माण झाले होते. त्यात पंतप्रधानांची तडकाफडकी बदलने असो, ब्रिटनची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि कोव्हिड-19 साथीचे ढिसाळ व्यवस्थापन हे निवडणुकीतील प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे ठरले होते. मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव होण्यासाठी हे मुद्दे कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील लेबर पक्षाने आतापर्यंत 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून, लेबर सरकारच्या काळात पक्षाच्या नेत्या अँजेला रायनर यांना उपपंतप्रधानपद दिले जाण्याची शक्यता आहे, तर अर्थतज्ज्ञ रेचल रीव्ह्स यांना अर्थमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. त्याचा सामना कसा करतात, ते आगामी काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण त्यांनी या निवडणुकीत चेंज म्हणजेच बदल हा एकच शब्द घेवून ही निवडणूक लढवली होती, आणि त्याचे पडसाद त्यांना या निवडणुकीत पाहायला मिळाले. ब्रिटनमध्ये मुख्यतः कर्ज आणि कर यांचा ताळमेेळ स्टार्मर यांना करावा लागणार आहे.

COMMENTS