जामीन दिल्यास बोठे फरार होऊ शकतो ;सरकार पक्षाने न्यायालयासमोर व्यक्त केली भीती, आता 17 रोजी सुनावणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामीन दिल्यास बोठे फरार होऊ शकतो ;सरकार पक्षाने न्यायालयासमोर व्यक्त केली भीती, आता 17 रोजी सुनावणी

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याची जामिनावर सुटका झाली तर तो

नगर शहराच्या आमदारांचं नीच राजकारण…. फलक लावत निषेध
दुषित जल शुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध
अहमदनगरमध्ये नारायण राणेंच्या प्रतिमेचे दहनI LOK News24

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याची जामिनावर सुटका झाली तर तो फरार होऊ शकतो, अशी भीती सरकार पक्षाच्यावतीने बुधवारी न्यायालयासमोर व्यक्त करण्यात आली. दरम्यान, बोठेने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सरकार पक्षाचा युक्तिवाद झाला असून, बोठेच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यास मुदत मागितल्याने येत्या 17 रोजी यावर पुढील सुनावणी होणार आहे.
रेखा जरे खूनप्रकरणातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे याने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असून, बुधवारी (दि.11) विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी यावर सरकार पक्षाचे म्हणणे सादर केले. आरोपी बोठेचे वकील अ‍ॅड. महेश तवले यांना म्हणणे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणीच्या कामकाजाबद्दल माहिती देताना बोठे याचे वकील अ‍ॅड. तवले म्हणाले की, सरकार पक्षाने म्हणणे सादर केले आहे. बोठेला जामीन देण्यास सरकार पक्षाने विरोध केला आहे. त्याने केलेला गुन्हा गंभीर असून, पोलिसांनी याबाबतचे बरेच पुरावे न्यायालयासमोर आणले आहेत. तो जामीनावर सुटल्यास फरार होऊ शकतो तसेच साक्षीदारांवर दबावही आणू शकतो, असे सरकार पक्षाचे म्हणणे असून यावर येत्या 17 रोजी मी म्हणणे मांडणार आहे, असेही त्यांनी सांगितले. न्यायालयीन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बोठे याचे वकील अ‍ॅड. तवले यांनी न्यायालयात म्हणणे सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागितली होती. त्यावर सरकारी वकील अ‍ॅड. यादव यांनी आपले म्हणणे न्यायालयाने ऐकून घ्यावे व त्यावेळेस आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे म्हणणे मांडले. न्यायालयाने ते मान्य करून यादव यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यानंतर अ‍ॅड. यादव यांनी युक्तिवाद केला. त्यांनी युक्तीवादात म्हटले की, रेखा जरे यांना मारण्यासाठी दोनवेळा प्रयत्न झाले आहेत. यापैकी, प्रथम दि.24 नोव्हेंबर 2020 रोजी प्रयत्न झाला. यावेळी एका डॉक्टरचे वाहन रेखा जरे यांच्या वाहनामागे असल्याने टेम्पोच्या सहाय्याने अपघाती खून करण्याचे नियोजन फसले. दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांना मारण्यासाठी आरोपी क्रमांक- 6.बाळ बोठे याने रेखा व तिची आई सिंधूबाई वायकर यांना वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला पाठविले. यानंतर त्यांचे जाताना-येताना लोकेशन सातत्याने घेऊन आरोपी क्रमांक- 5. सागर भिंगारदिवे याला सांगितले. आरोपी भिंगारदिवे हा रेखा जरे यांच्या लोकेशनची माहिती आरोपी क्रमांक- 2. आदित्य चोळके याला सांगत होता. आरोपी चोळके हा लोकेशनची माहिती आरोपी क्रमांक- 1. ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्ड्या शिंदे व आरोपी क्रमांक-3. फिरोज शेख यांना देत होता. यानंतर पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाट येथे रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे आणि फिरोज यांनी वाहनाने कट मारल्याच्या कारणातून भांडण काढले. त्यावेळेस आरोपी फिरोज याने रेखा जरे यांचा फोटो काढून आरोपी आदित्य चोळके व सागर भिंगारदिवे यांच्यामार्फत बाळ बोठे यांना पाठवत होता. मारण्याची व्यक्ती रेखा जरे असल्याबद्दल सांगितल्याने आरोपी ज्ञानेश्‍वर शिंदे व फिरोज शेख यांनी बोठे याच्या इशार्‍यावरून धारदार चाकूने गळा कापून निर्घृण खून केला. जरे यांच्यासमवेत उपस्थित असणार्‍या विजयमाला माने, आई सिंधूबाई, मुलगा कुणाल हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, असे आरोपपत्रात नमूद केले आहे. रेखा जरेचा खून झाल्यावर बोठे याने सुपारीच्या 12 लाखांची रक्कम पिवळ्या बॅगेतून आरोपी भिंगारदिवे याला दिली. आरोपींमध्ये मोबाईलवर बोलणे झाल्याचे बोठेच्या कार्यालय तसेच सागर याच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत दिसून येत आहे. सुपारीच्या रक्कमेपैकी सहा लाख 50 हजार रुपये भिंगारदिवे याच्या घरातून पंचासमक्ष हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये ता. 24 व ता. 30 रोजी मोबाईलद्वारे अनेकदा संभाषण झाल्याचे स्पष्ट होत आहे. खुनाच्या घटनेच्या वेळेस रेखाचा मुलगा कुणाल याने आरोपीचा फोटो काढला आहे. तो महत्वाचा दुवा ठरत आहे, असा युुक्तिवाद सरकार पक्षाने केला. यावर आता 17 रोजी बोठेच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे.

त्याचे वर्तन लक्षात घ्यावे
युक्तिवाद करताना सरकारी वकील अ‍ॅड. यादव यांनी सांगितले की, बोठे याने रेखा जरेशी वितुष्ट आल्याने शांत डोक्याने कट रचून खुनासाठी भिंगारदिवे व चोळके मार्फत पैसे पुरविले आहेत. खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने शंभरपेक्षा जास्त दिवस तेलंगणा राज्यात आश्रय घेतला होता. बोठेला कायदेशीर ज्ञान आहे. घटनेअगोदर आणि त्यानंतरचे वर्तन लक्षात घेऊन त्याला जामीन देऊ नये.

COMMENTS