Homeताज्या बातम्यादेश

नीट समुपदेशन थांबवण्यास सर्वोच्च नकार

नवी दिल्ली ः नीट परीक्षेतील घोळ अजूनही संपलेला नसतांना गुरूवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने नीट समुपदेशनावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. अंत

Raigad | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीवर गुन्हा दाखल| LOKNews24
हरवलेला मुलगा अवघ्या बारा तासात मुंबईत शोधला
अडवाणींना राष्ट्रपती बनवायला हवे होते : संजय राऊत

नवी दिल्ली ः नीट परीक्षेतील घोळ अजूनही संपलेला नसतांना गुरूवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने नीट समुपदेशनावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. अंतिम सुनावणीनंतर परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी 11 जून रोजीही सर्वोच्च न्यायालयाने हे अपील फेटाळले होते. परीक्षा रद्द करण्याची मागणी करणार्‍या नव्या याचिकेवर गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 49 विद्यार्थी आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. परीक्षेत 620 पेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची पार्श्‍वभूमी तपासण्याची आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पेपरफुटीच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. त्याचवेळी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयाला देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या सर्व याचिका एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे सुनावणी करण्यास सांगितले आहे. एनटीएने सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी 4 याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या सुटी खंडपीठासमोर या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नीट समुपदेशनाला स्थगिती देण्यास नकार दिला.

COMMENTS