Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळूच शकत नाही

ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांचा दावा

मुंबई ः मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपला लढा तीव्र केला असला तरी, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळू शकत नाही. आणि मनोज जरांगे

कुणबी नको, स्वतंत्र आरक्षण द्या
सहा महिन्यात मराठा समाजाला आरक्षण द्या
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

मुंबई ः मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपला लढा तीव्र केला असला तरी, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळू शकत नाही. आणि मनोज जरांगे यांची सरसकट आरक्षण देण्याची मागणी सरकार ही मागणी कोणत्याही स्थितीत मान्य करू शकत नाही, असा दावा ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे मराठा समुदायाला ओबीसीत सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे. पण त्यांच्या या मागणीला ओबीसी समुदायाने कडाडून विरोध केला आहे. या प्रकरणी जालन्याच्या वडीगोद्रीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषणही सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर बबनराव तायवाडे यांनी सरकार जरांगेंची सरसकट आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही स्थितीत पूर्ण करू शकत नसल्याचा दावा केला आहे. मनोज जरांगेंनी सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सरकार त्यंची ही मागणी मान्य करू शकत नाही. आमचा या मागणीला विरोध असल्यामु्ळे सरकार अशा कोणत्याही मागणीला पाठिंबा देणार नाही. सरसकट आरक्षण देऊ नये या आमच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत, असे बबनराव तायवाडे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. कोणतेही आंदोलन सुरू झाले की, त्या समाजातील जनता काहीशी भावनिक होते. पण त्यांनी भावनिक न होता संयम पाळून नेत्यांची साथ द्यावी. इतर समाजाचे नुकसान होईल असे कोणतेही कृत्य कर नये, असेही ते यावेळी म्हणाले. बबनराव तायवाडे यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्या विधानसभेच्या 288 जागा लढवण्याच्या घोषणेचे स्वागतही केले. जरांगेंची 288 जागा लढवण्याची इच्छा असेल तर चांगलेच आहे. त्यांनी आपली ताकद तपासून पहावी. त्यांची ताकद निवडणूक लढल्यानंतर स्पष्ट होईल. यात जनतेला ग्राह्य धरून किती यश मिळेल हे पहावे लागेल. जनतेचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पाठिंबा वेगवेगळा असतो. सध्या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला वेठीस धरले जात आहे. यावर लोकांनी विचार करावा, असे ते म्हणाले. आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला वेठीस धरलं जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. याचा विचार लोकांनी करायचा आहे. आम्ही जे करत आहे, त्याने समाजात द्वेष निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतोय. संविधानाने हक्क दिला आहे, पण मागणी करताना इतर कोणावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

COMMENTS