Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

12 जुलै रोजी मतदान सत्ताधार्‍यांसोबत विरोधकांकडून मोर्चेबांधणी

मुंबई ः  लोकसभा निवडणुका संपल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र त्यापूर्वी विधानपरिषदेच्या 11 जागांची निवड

हॉटेलमधे मारहाण करणार्‍या चौघांवर गंभीर गुन्हा दाखल
लग्नाच्या दिवशी नवरीचा मृत्यू
चांदोरी बनावट दारू निर्मिती प्रकरणात सहा आरोपींना पोलीस कोठडी

मुंबई ः  लोकसभा निवडणुका संपल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र त्यापूर्वी विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेचे 11 सदस्य पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहेत.
विधानसभा सदस्य विधान परिषदेतील आमदारांची निवड करणार आहेत. 25 जून पासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल.12 जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. 12 जुलै रोजीच होणार पाच वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे 27 जुलै रोजी निवृत्त होणार्‍या 11 आमदारांपैकी चार भाजपचे, दोन काँग्रेसचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शेतकरी आणि कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडे प्रत्येकी एक जागा आहे. दरम्यान, आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती 9 जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

निवृत्त होणारे सदस्य – विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेले विधानपरिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. 27 जुलै रोजी कार्यकाळ संपणार्‍या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या 11 आमदारांचा समावेश आहे.

COMMENTS