Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातील उद्योजकाला खंडणीची मागणी

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील उद्योजक धीरज सदाशिव मैड यांना एक कोटींची खंडणीची मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली असून याबाबत सोमवारी

*हम दो, हमारे तीन!; चीनमध्ये नवे संतती धोरण लागू होणार l पहा LokNews24*
समताचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना एन.डी.आर.एफचे मार्गदर्शन
सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील उद्योजक धीरज सदाशिव मैड यांना एक कोटींची खंडणीची मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली असून याबाबत सोमवारी पोलीस पाथर्डी पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे व्यावसायिक भीतीचे वातावरण पसरले आहे. मैड हे तिसगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक असून त्यांचा सराफ व्यवसाय, पेट्रोल पंप व इतर उद्योग व्यवसाय आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, धीरज मैड हे रविवारी (ता.9) रोजी सकाळी तिसगाव येथील राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर फोन करुन एक अज्ञात इसम हा म्हणाला की, मुझे पहचाना क्या, मै जहा बैठा हु वहा तुमारी सरकार और पोलीस पौहच नही सकती हमने बहुत लोगो का गेम किया है, तो भी पोलीस हमारा कुछ बिघाड नही पाई.आपको जान प्यारी है, तो तुम मुझे एक खोका दो नही दिया तो तुझे और तेरे बच्चो को मार डालुंगा अशी धमकी देत त्यानंतर मैड यांनी फोन ठेवुन दिला. पुन्हा फोन करून मैड यांना एक इसमाने धमकी देवुन एक खोक्याची मागणी केली. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी पावण्यानऊ वाजता (ता.10) फोन करुन एक कोटी रुपायाची मागणी करुन म्हणाला की, जर तुला तुझ्या कुटुंबाला जिवंत राहीचे असले तर मला एक कोटी रुपये दे, नाही तर मी तुला व तुझ्या कुटुंबाला जिवेच ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. मी पुन्हा तुला फोन करीन विचार करुन सांग असे बोलावुन फोन ठेवुन दिला. या सर्व प्रकाराने व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ज्या नंबर वरून धमकी देण्यात आली त्या नंबरचा तपास करत आहे.

COMMENTS