देवळाली प्रवरा ः दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान व ग्लोबल वार्मिंग यासाठी वृक्ष लावा-वृक्ष जगवा, ही चळवळ राज्यात व देशात जोमाने फोफावण्याची गरज असू
देवळाली प्रवरा ः दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान व ग्लोबल वार्मिंग यासाठी वृक्ष लावा-वृक्ष जगवा, ही चळवळ राज्यात व देशात जोमाने फोफावण्याची गरज असून आता सुरू झालेल्या पावसाळ्यात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून देशातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून ते वाढवावे, असे आवाहन राहुरी न्यायालयाच्या न्यायाधीश पार शेट्टी यांनी केले आहे.
असा उन्हाळा आम्ही कधी पाहिला नव्हता असे उदगार वयस्कर मंडळींच्या तोंडून यावर्षी आपणास नक्कीच ऐकायला मिळाले. एवढे उच्च तापमान आणि उष्माघाताने जीव गमावणार्यांची आकडेवारी धडकी भरवणारी होती . उष्णतेच्या तीव्रतेने जीवाची लाहीलाही झाली होती . अंगातून पाण्याच्या धारा वाहत होत्या . परंतू एवढी उष्णता का वाढली आणि यावर त्वरित काय उपाय करावा यासाठी तातडीने पाऊले उचलली गेली नाहीत हे ही तितकेच खरे आहे .विकासाच्या नावाखाली मानवाने असंख्य वृक्षतोड केली परंतु त्या प्रमाणात वृक्ष लागवड केली नाही. आणि जी केली ती फक्त फोटो पुरतीच मर्यादित होती .आता निसर्गसृष्टी वाचवायची असेल तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत वृक्ष लागवड चळवळ मोठ्या प्रमाणात उभी करावी लागेल आणि वृक्ष लागवड करून त्याचे संरक्षण ही करावे लागेल.
प्रसारमाध्यमंद्वारे आपण फार ज्ञानी असल्यासारखे झाडे लावा झाडे जगवा,पाणी आडवा पाणी जिरवा असे मेसेज पाठवून उपयोग होणार नाही तर आता गरज आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची. नाही तर पुढील दोन वर्षात उष्णतेच्या तीव्रतेने त्वचेचे विकार होऊन माणसाची अवस्था ही भाजलेल्या पापडा सारखी झाल्या शिवाय राहणार नाही .आता सृष्टी वाचवायचे असेल तर वृक्ष लागवडी शिवाय पर्याय नाही आणि हाच संदेश प्रत्यक्ष कृती करून राहुरीच्या न्यायाधीश सपार शेट्टी यांनी सर्व समाजाला दिला आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान व ग्लोबल वार्मिंग यासाठी वृक्ष लावा-वृक्ष जगवा, ही चळवळ राज्यात व देशात जोमाने फोफावण्याची गरज असून आता सुरू झालेल्या पावसाळ्यात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून देशातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून ते वाढवावे, असे आवाहन राहुरी न्यायालयाच्या न्यायाधीश सौ.पार शेट्टी यांनी केले आहे. राहरी न्यायालय, राहुरी नगरपरिषद, विधी सेवा संघ व राहुरी बार असोसिएशन यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम न्यायाधीश सौं. पार शेट्टी, सहन्यायाधीश सौ.आर.एस. तापडिया, सहन्यायाधीश मयूरसिंह गौतम, सहन्यायाधीश आदित्य शिंदे व मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याहस्ते पार पडला.न्यायालय परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करून हा परिसर हरित करण्यासाठी सर्व असोसिएशनचे पदाधिकारी प्रयत्न करतील, असा संकल्प सर्व विधितज्ञांनी यावेळी व्यक्त केला. नव्याने रुजू झालेल्या न्यायाधिश सौ. पार शेट्टी व सर्व न्यायाधीशांचा बार असोशियन तर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे, राहुल शेटे, बाळासाहेब भास्कर, माऊली येवले, प्रसाद कोळसे, बाबा खुरूद, अमोल पानसंबळ, योगेश शिंदे, गजू तनपुरे, संभाजी कदम, संदीप खर्डे, सुनील घोगरे, अजय पगारे, ऋषी पंडित, राहुल बर्डे, किरण धोंडे, मोहनीश शेळके, आसिफ शेख, जीवन राऊत, रवी गागरे यांच्यासह सर्व वकील व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS