Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 95 टक्के मतदान

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सातारा सोसायटी मतदारसंघासाठी आज सातारा येथे शांततेत मतदान पार पडले. मतदान प्रक्रियेत 416 पै

12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
प्रतीक पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी …?
मसूरच्या स्मशानभूमिची अज्ञाताकडून तोडफोड

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सातारा सोसायटी मतदारसंघासाठी आज सातारा येथे शांततेत मतदान पार पडले. मतदान प्रक्रियेत 416 पैकी 397 मतदारांनी सहभाग नोंदवला. या मतदानाची टक्केवारी 95.43 टक्के नोंद झाली असून मंगळवार, दि. 23 रोजी सातारा येथे मतमोजणी होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणार्‍या भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. पक्षविरहित बँकेची वाटचाल यापुढेही कायम तशीच राहावी, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी चर्चा, परस्पर सामंजस्याने निवडणूक टाळण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांमुळे निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. पहिल्याच टप्प्यात राजघराण्यांतील खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे, श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर व शिवरुपराजे खर्डेकर यांच्यासह 11 संचालक बिनविरोध निवडून आले होते.
यामुळे उर्वरित जागांचा तिढा वाटाघाटी आणि चर्चेअंती मोकळा होईल, असे अनेकांचा वाटत होता. मात्र, त्यास अपयश आले. 11 जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित दहा जागांसाठी लागलेल्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या मतदान प्रक्रियेदरम्यान प्रत्येक मतदाराला ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला एक, तर महिला गटातील दोन उमेदवारांना प्रत्येकी एक याप्रमाणे दोन मते द्यायची होती. मतदान केंद्रावर दिवसभरात 397 मतदारांनी मतदान केले. या मतदान प्रक्रियेत 19 मतदारांनी मतदानाला दांडी मारली.

COMMENTS