जळगाव प्रतिनिधी - जामनेर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. यात एकुण ८६.८६ टक्के मतदात झाले होते. आज मंगळवा
जळगाव प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. यात एकुण ८६.८६ टक्के मतदात झाले होते. आज मंगळवारी जामनेर पंचायत समिती आवारात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपासून सर्व निकाल घोषीत करण्यात आले. जामनेर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. उर्वरित ३ ग्रामपंचायती देखील आमच्या संपर्कात असल्याची माहिती जामनेर शहराच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनी दिली. दरम्यान, आज सकाळपासून ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागून होती. जामनेर पंचायती समितीच्या आवारात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. निकाल घोषीत केल्यानंतर विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. तसेच ढोल ताश्यांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्याच्या तयारीला वेग आला होता.
COMMENTS