Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने 83 लाखांची फसवणूक

पुणे/प्रतिनिधी ः एका भामट्याने आपल्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध विभागात ओळखी असून शासनाचे टेंडर मिळवून देतो असे आमिष वेगवेगळ्या

आयफोन खरेदीच्या नावाने 5 लाखाचा गंडा
पुण्यात वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने साडेसोळा लाखांचा गंडा
शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः एका भामट्याने आपल्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध विभागात ओळखी असून शासनाचे टेंडर मिळवून देतो असे आमिष वेगवेगळ्या व्यावसायिकांना दाखवले. त्यानंतर पुण्यातील बिबबेवाडी परिसरातील एका व्यवसायिकाची तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी हेमंत खिवंसरा (राहणार -मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे) याच्यासह इतर आरोपींवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आरोपी विरोधात राजेश कृष्णाथ एकबोटे (बिबवेवडी, पुणे) यांनी बिबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 2018 पासून आतापर्यंत घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत खीवंसरा याने तक्रारदार राजेश एकबोटे यांना विविध प्रकारच्या व्यवसायांच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवले. तक्रारदारासह इतर काही व्यवसायिकांचा त्यांनी विश्‍वास संपादन करून आपापसात संगणमत करून व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून तक्रारदार यांच्यासह इतर काही व्यावसायिकांकडून रकमा घेऊन, त्या परत न करता तक्रारदार यांची तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पुढील तपास करत आहेत. पीएसआय चौधरी यांनी सांगितले की, आरोपी हा केंद्र शासनाच्या ई-ग्राम योजना टेंडर मिळून देतो असे आमिष वेगवेगळ्या व्यावसायिकांना दाखवत होता. त्यानंतर संबंधित कंपनीत शिरकाव करून, सदर कंपनी ताब्यात घेऊन पैसे लुबाडून तो फरार होत असे. व्यवसायिक यांना कन्सल्टंट असल्याचे सांगून, लोकांशी गोड बोलून त्यांचा विश्‍वास संपादन करून मंत्री, अधिकारी यांना पैसे द्यायचे आहे. गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून तो लाखो रुपये व्यावसायिकांकडून घेत होता. त्यानंतर व्यवसायिकांचे कोणतेही काम न करता, त्यांची फसवणूक करण्यात येत होती .बुलढाणा, पुणे, अहमदनगर, अकोला आदी शहरांमध्ये आरोपीने अशा प्रकारे व्यावसायिकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

COMMENTS