Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेऊर कुंभारी स्मशानभूमीस 80 हजार रुपयांची शवदानी

कोपरगाव प्रतिनिधीः कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील स्मशानभूमीस जिल्हा परीषद निधीतून अंदाजे 80 हजार रुपये किमतीची एक शवदानी दिली असल्याची

 मंदिरातून पावणेचार लाखाचे दागिने लांबवले
माजी आमदार वैभव पिचड अधिकाऱ्यांवर संतापले.
जिल्हा न्यायालयातील 23 न्यायाधीशांना निरोप

कोपरगाव प्रतिनिधीः कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील स्मशानभूमीस जिल्हा परीषद निधीतून अंदाजे 80 हजार रुपये किमतीची एक शवदानी दिली असल्याची माहिती कोपरगाव तालुका पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी सांगीतले. त्याबद्दल सोमवार 8 मे रोजी कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात येथे जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी सचिन सर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला
 या प्रसंगी माजी सभापती शिवाजीराव वक्ते,माजी संचालक मधुकर वक्ते, माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड,माजी सरपंच कैलासराव वक्ते,ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव आव्हाड, प्रदीप गायकवाड, संजय वक्ते, बाळासाहेब पवार, तुषार गुरसळ, भाऊसाहेब वक्ते, करणा वक्ते, दत्तात्रय वक्ते  मधुकर वक्ते आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिवाजीराव वक्ते यांनी बोलतांना सांगितले की, स्मशानभूमी परिसर सुशोभीत करण्यासाठी न.रे.गा. योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे, तसेच आगामी काळात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी गावासाठी नवनवीन योजना राबवण्यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन वक्ते यांनी करत गटविकास अधिकारी यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपसरपंच ताराचंद लकारे यांनी तर आभार माजी संचालक मधुकर वक्ते यांनी मानले.

COMMENTS