Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बस आणि आयशरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

जालन्यातील वडीग्रोदी रोडवरील शहापूरजवळ अपघात

जालना : राज्यातच नव्हे तर देशात अपघाताची संख्या वाढत  असून, त्यात मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतांनाच जालन्याच्या वडीगोद्री

विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात
मुंब्रा येथील बायपास वर भीषण अपघात
गुजरातमधील अरवली जिल्ह्यात भीषण अपघात

जालना : राज्यातच नव्हे तर देशात अपघाताची संख्या वाढत  असून, त्यात मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतांनाच जालन्याच्या वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ बस आणि आयशरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बसमधील 6 तर ट्रकमधील दोघांचा समावेश आहे. 16 जण जखमी झालेत. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.गेवराईकडून अंबडकडे जाणार्‍या बसने आयशर ट्रकला धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळाले आहे.
जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरुन येणार्‍या आयशर ट्रकची समोरा समोर धडक झाली. या भीषण अपघातात 8 जण जागीच ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात एवढा भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, गेवराईकडून अंबडकडे जाणार्‍या बसची आणि मोसंबी भरून येणार्‍या आयशर ट्रकचा समोरा समोर अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाला आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जण गंभीर आहेत. या अपघातामुळे जालना-बीड मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातग्रस्त ट्रकमधून मोसंबी वाहतूक केली जात होती. जखमींना उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जालना बीड मार्गावरील शहागडजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर तातडीने स्थानिक त्यांच्या मदतीला धावले. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी मदत कार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. नक्की अपघात कसा झाला ही माहिती अजून ही पुढे आली नाही.

COMMENTS