Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीव्हीजी डेव्हलपर्सची 7 कोटींची फसवणूक

पुणे ः पुण्यातील नामांकित बीव्हीजी डेव्हलर्पसच्या नावाने बनावट विनंतीपत्र बनवून त्यावर भागीदारांचे बनावट सह्या करुन, त्याद्वारे बीव्हीजी डेव्हलर्

पोलिसांच्या 2 पेट्रोल पंपावर 20 लाखाची फसवणूक
टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने 83 लाखांची फसवणूक
बनावट कागदत्रांद्वारे बँकेकडून 18 लाखांचे कर्ज

पुणे ः पुण्यातील नामांकित बीव्हीजी डेव्हलर्पसच्या नावाने बनावट विनंतीपत्र बनवून त्यावर भागीदारांचे बनावट सह्या करुन, त्याद्वारे बीव्हीजी डेव्हलर्पस या भागीदारी संस्थेचे मंजूर मुदतकर्ज खात्यातून परस्पर वेगवेगळया फर्मच्या खात्यावर पैसे वळवून 6 कोटी 94 लाख 18 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विभीषण व्यंकटराव गायकवाड (वय- 53,रा.निगडी,पुणे) यांनी 4 आरोपींविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बांधकाम व्यवसायिक विजय अरविंद रायकर (वय-46,रा.सिंहगड रोड,पुणे), शाहबाज जफर सय्यद मोहमंद जफर (रा.गहुंजे, ता.मावळ,पुणे), बांधकाम व्यवसायिक गौरव सुनिल सोमाणी (35,रा. बिबवेवाडी,पुणे) व महेश भगवनराव नलावडे या आरोपींवर भांदवि कलम 420, 409, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 25 ऑक्टोबर 2019 ते 18 जानेवारी 2020 दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहबाज जफर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची औद्योगिक वित्त शाखा पिंपरी येथे रिलेशनशिप मॅनेजर पदावर असताना, पदाचा गैरवापर करुन बांधकाम व्यवसायिक विजय रायकर, गौरव सोमाणी व महेश नलावडे यांच्याशी संगनमत केले. बीव्हीजी डेव्हलर्पसचे नावाचे बनावट विनंतीपत्र बनवून त्यावर तक्रारदार व त्यांचा भाऊ बाळासाहेब गायकवाड यांच्या बनावट सह्या केल्या.

COMMENTS